शुक्रवार, ९ डिसेंबर, २०११

वरोरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०११

वरोरावासी दोस्तहो, वरोरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०११ साठीचे मतदान १६ डिसेंबर रोजी होणार आहे. वरोरा नगर परिषदेच्या योग्य कार्यासाठी व दूरदृष्टी ठेवून विकासकामांसाठी प्रहार पक्षातर्फे एकूण ८ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वांचे बोधचिन्ह आहे- कप बशी 


समाज सुधारणेच्या माझ्या प्रयत्नांसाठी व त्यांना बळकटी मिळण्यासाठी खालील उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मदत करा. त्यासाठी स्वतहून प्रचार करा व फोन/SMS करून इतरांसही यांनाच मतदान करण्यासाठी सांगा. मी वरोर्याच्या विकासासाठी तुमच्या सर्वांचे सहकार्य मागतो आहे ... धन्यवाद !

प्रहारचे उमेदवार 


प्रभाग १
१-अ) सौ. सरिता दिनदयाल बडोले (SC - महिला राखीव प्रवर्ग)
१-ब) गणेश फकरूजी जोगी (सर्वसाधारण)
१-क आणि १-ड मध्ये प्रहारचे उमेदवार नाहीत.

प्रभाग २
२-अ) सौ. सुनिता अशोक गायधने  (SC - महिला राखीव प्रवर्ग)
२ -ब) कु. सरिता दादाराव दडमल   (ST - महिला राखीव प्रवर्ग)
२-क) प्रहारचे उमेदवार नाहीत.
२-ड) मनीष मुरली जेठानी (सर्वसाधारण)

प्रभाग ३
३-अ) राजेंद्र गुरुचरण मर्दाने (SC - राखीव प्रवर्ग)
३-ब, ३-क व ३-ड मध्ये प्रहारचे उमेदवार नाहीत.

प्रभाग ४
प्रहारचे उमेदवार नाहीत.

प्रभाग ५
५-अ) निलेश विठ्ठलराव मजगवळी (सर्वसाधारण)
५-ब) प्रहारचे उमेदवार नाहीत.
५-क) प्रहारचे उमेदवार नाहीत.
५-ड) सौ. सुलोचना रमेश काळे (सर्वसाधारण महिला राखीव)


प्रभाग ६ 
प्रहारचे उमेदवार नाहीत.

सोमवार, ५ डिसेंबर, २०११

वरोरा नगर परिषद निवडणूक-२०११


प्रहारच्या उमेदवारांचे वरोरा नगर परिषद निवडणूक-२०११ करिता बोधचिन्ह- कपबशी

दारू नाही, चाय पिलायेंगे
कपबशी चून के लायेंगे |


प्रहारचे उमेदवार 


प्रभाग १
१-अ) सौ. सरिता दिनदयाल बडोले (SC - महिला राखीव प्रवर्ग)
१-ब) गणेश फकरूजी जोगी (सर्वसाधारण)
१-क आणि १-ड मध्ये प्रहारचे उमेदवार नाहीत.

प्रभाग २
२-अ) सौ. सुनिता अशोक गायधने  (SC - महिला राखीव प्रवर्ग)
२ -ब) कु. सरिता दादाराव दडमल   (ST - महिला राखीव प्रवर्ग)
२-क) प्रहारचे उमेदवार नाहीत.
२-ड) मनीष मुरली जेठानी (सर्वसाधारण)

प्रभाग ३
३-अ) राजेंद्र गुरुचरण मर्दाने (SC - राखीव प्रवर्ग)
३-ब, ३-क व ३-ड मध्ये प्रहारचे उमेदवार नाहीत.

प्रभाग ४
प्रहारचे उमेदवार नाहीत.

प्रभाग ५
५-अ) निलेश विठ्ठलराव मजगवळी (सर्वसाधारण)
५-ब) प्रहारचे उमेदवार नाहीत.
५-क) प्रहारचे उमेदवार नाहीत.
५-ड) सौ. सुलोचना रमेश काळे (सर्वसाधारण महिला राखीव)


प्रभाग ६ 
प्रहारचे उमेदवार नाहीत.

गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०११

चल उठ तरुणा, देश तुला बोलावतोय… विजय तुला खुणावतोय…


८ डिसेंबर रोजी होणार नगर परिषदेची निवडणूक!
खऱ्या लोकशाहीच्या मार्गाने, दारू – पैसा न वाटता, जात – धर्म न सांगता लढण्यासाठी ‘प्रहार पक्षातर्फे’ अगदी तरुण उमेदवार निवडणुकीत उतरत आहेत, त्या सर्वांच प्रथम अभिनंदन |
अनेक तरुण या चांगल्या कार्यास पाठींबा आहे असा म्हणतात, खरोखरीच मदतही करतात… पण त्यांना प्रश्न, जर दोन चोर रिंगणात असतील तर त्यापैकीच एक निवडून येणार ना ? चांगला देश, चांगलं गाव हवा आहे? मग तुम्हालाही मैदानात उतरावे लागेल…
लोक नोकरी करून, धंदा सांभाळून नगर-सेवक आहेत, तुम्ही अभ्यास, नोकरी सांभाळून नगर-सेवक बनू शकणार नाही? नक्कीच बनू शकता आणि तुम्ही योग्य कार्यही करू शकता — मी रुपेश घागी स्वतः तुमच्या सोबत आहे
२१ वर्षांच्या वर वय आहे न? मग या मैदानात…
(वरोरा व इतरही शहरातील इच्छुक तरुणांनी संपर्क साधा- rupesh.ghagi@maximess.com/ 9730445045)

शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०११

शेतकरी महामोर्चास मार्गदर्शन: चंदुभाऊ वानखेडे

चंदुभाऊ वानखेडे, जेष्ठ पत्रकार 
प्रहारचा शेतकरी महामोर्चा, २३ सप्टेंबर २०११ रोजी दसरा मैदान अमरावती येथे मार्गदर्शन करताना 

बुधवार, २८ सप्टेंबर, २०११

शेतकऱ्यांचे डेरा आंदोलन... मुख्यमंत्र्यांनी मागितली तीन महिन्याची मुदत...

२६ तारखेला पुणे येथे मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलाविलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शेतकरी, मा. आ. बच्चुभाऊ कडू व इतरांशी चर्चा केली. मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व मागण्यांचा राज्य व केंद्र स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत मागितली.

मागण्यांचे स्वरूप बघून शेतकर्यांनी हि मुदत सरकारला दिली व मुख्यमंत्र्यांच्या गावी निघालेले शेतकरी, आंदोलन 'तूर्तास' स्थगित करून परतले.

सरकारा सावध... गाठ बळीराजाशी  आहे...

मुदत पाळा, नाही तर रुंमणं   घेऊन आम्ही आहोच तय्यार !!!

रविवार, २५ सप्टेंबर, २०११

बळीराजा दंड थोपटतो तेव्हा...

वर्षानुवर्षे चालत आलेल्या अन्यायाविरुद्ध शेतकरी पेटला. प्रहार चे संस्थापक-अध्यक्ष आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात, देशभरातील शेतकरी नेत्यांच्या साक्षीनं सुरु झाला महासंग्राम..." भिक नको, ... घेऊ घामाचे दाम! "

थोडक्यात आत्ता पर्यंतचा वृत्त्तांत

२३ सप्टेंबर. दसरा मैदान, अमरावती 
४० हजार शेतकरी एका आवाजात ललकारी देत होते... "आता मरणार नाही, लढणार आम्ही!"
शेतमजुरांची मजुरी व शेतकऱ्यांचे उत्पन्न सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे कमीत-कमी ३०० रु. रोज व्हायलाच पाहिजे. त्याकरिता पेरणी-ते-कापणी पर्यंत सर्व कामे रोजगार हमी योजनेतून घ्या, सर्व जमिनीला सिंचनाची व्यवस्था करा, हमीभाव इ. अनेक मागण्यांतून शेतकऱ्याला सन्मानान जगता यावे, त्याच्या घामाच्या धारांसोबत अन्याय होऊ नये अशा मागण्या करण्यात आल्या. सुमारे आठ हजार शेतकरी आपलं गार्हाण घेऊन मुख्यमंत्र्यांच्या गावाकडे झाले रवाना. पूर्ण अमरावती दुमदुमली... बळीच राज्य येऊ दे !    

२४ सप्टेंबर.
नांदगाव(खं.)- कारंजा- सेलू बाजार- मालेगाव- मेहकर-सिंदखेड राजा
भरगच्च सभा, भारलेलं वातावरण. सगळीकडे बळीराजाचा दबदबा.आ. सुभाष झनक यांचा आंदोलनास पाठींबा.
दिवसभरात अनेक सभा घेण्यात आल्या. सिंदखेड राजा येथे मुक्काम. 

२५ सप्टेंबर.
सिंदखेड राजा -(पूजन व सभा)-जालना- औरंगाबाद- नेवासा- देवगाव(मुक्काम.)  
शेतकर्यांचा वाढता प्रतिसाद. हक्काच्या लढाईसाठी गरजणारा शेतकरी. सरकारचे डावपेच सुरु.
सातारा जिल्ह्यात सरकारने जमावबंदी लागू केली. 
रात्री बच्चूभाऊंना अटक करण्यासाठी पोलीस आले असताना, शेतकरी माय-माउलींनी   पदर खोचला..."न्या आमच्या भाऊंना पकडून--- आम्ही मुक्कामास असलेल्या तिसर्या मजल्यावरूनच खाली उडी टाकू---" बच्चूभाऊंसाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी हा प्रतिसाद पाहून पोलिसाना ग्यावी लागली माघार...
आता बळीचा राज्य येणार.

आजचा कार्यक्रम 
२६ सप्टेंबर.
शिकारपूर- चाकण- देहू(रक्तदान शिबीर)-पुणे- सातारा
आज सभा व रक्तदान शिबीर घेण्याला सरकार विरोध करतंय. प्रहार रक्त देऊन क्रांती करणारच- रक्तदान शिबीर होणारच... महाराष्ट्रात आजपर्यंत सर्वात जास्त रक्तदान करून रुग्णांना वाचवणारी संघटना आज शेतकऱ्याच्या आंदोलनासाठी पुन्हा रक्तदान करणार...

आणि गरज पडलींच तर उद्याही रक्त...

शेतकऱ्यांच्या हक्काच्या लढाईत सामील व्हा--- पुणे परिसरातील मित्रहो--- आज दु. चार वाजता देहू येथे येऊन आंदोलनास आपलाही पाठींबा द्या.

शनिवार, २४ सप्टेंबर, २०११

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गुणकारी 'बाम' - एक बाम, अनेक काम


३०-४० हजार शेतकर्यांनी मा. आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सरकारविरुद्ध व उदासिनतेविरुद्ध रणशिंग फुंकले. राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांच्या या एतिहासिक संमेलनास भारतभरातील अनेक शेतकरी नेते हजार होते. हमीभाव, शेतीसाठी पाणी अशा अनेक मागण्यासोबातच आमदार बच्चू कडू यांनी एक महत्वाची मागणी केली. पेरणीपासून कापणीपर्यंत शेतातील सर्व कामे रोजगार हमी योजनेत आणावीत व सहाव्या वेतन आयोग प्रमाणे शेतमजुरांची मजुरी ३०० रुपये प्रतिदिन एवढी करावी. महाराष्ट्र सरकारचे रोजगार हमी योजनेचे यावर्षीच्या ६०० कोटींपैकी १०० कोटीही खर्च झाले नाहीत. पण आ. बच्चू भाऊंच्या सूचनेप्रमाणे सरकारने जर रोजगार हमी योजनेत हि कामे घेतली तर शेतकऱ्यांना हा खर्च लागणार नाही व शेती व्यवसायाला पुन्हा सोन्याचे दिवस येतील. 

समाजाचं काय ?


बुधवार, २१ सप्टेंबर, २०११

मनमोहना, अजब तुझे सरकार...

शहरात जीवन जगण्यासाठी एका व्यक्तीला दिवसाकाठी ३२ रुपये पुरेसे आहेत तर खेड्यात २६ रुपये पुरेसे आहेत असं प्रतिज्ञापत्र नियोजन आयोगानं, पंतप्रधानांच्या सहीनिशी सर्वोच्च न्यायालयात सादर केलं. त्यापेक्षा जास्त खर्च करू शकणारे बी.पी.एल. (दारिद्र्य रेषे खाली) मध्ये नाहीत. अजूनही मनमोहन आमचा हुशार अर्थतज्ञ आहे असं म्हणून जर कोणी त्याची हुशारी बघून त्यांनी देशाचा चालवलेला खेळखंडोबा सहन करा असं सांगितलं, तर त्याला का तुडवू नये.

सामान्य माणसाची अशी थट्टा करण्याचा अधिकार सरकारला; भारतासारख्या लोकशाही देशातच आहे!

मंगळवार, २० सप्टेंबर, २०११

आता मरणार नाही, लढणार आम्ही.

दोन सख्या भावांत जेव्हा वाटणी होते, तेव्हा इंच भराच्या अन्यायाच्या फक्त शंकेवरून एक भाऊ दुसर्यावर धावून जातो. वावर पडो, पण धुर्यासाठी लढू - अशी  आमची लढाऊ वृत्ती. पण जेव्हा मायबाप सरकार पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या दोन ठिकाणच्या शेतकरी भावांना दोन वेगळ्या मापात तोलते तेव्हा आम्ही या सरकारवर का धावून जात नाही. आमच्या नोकरशहा, कर्मचारी भावाला तुपाशी खाऊ घालताना आम्ही कास्तकार उपाशी आहोत हे या सरकारला दिसत नाही का? खर तर शेतकरी कुठलाही असो, कमी अधिक प्रमाणात नाडल्याच जात आहे. पण ज्याच्यावर सगळ्यात जास्त अन्याय झाला तो आमचा लढाऊ वैदर्भीय शेतकरी आताही जागणार नाही का ?

चला उठा , दाखवून द्या या काळ्या आईला... तिच्या लेकरांत अजूनही रग आहे. 
चला, आपल्या संपर्कातल्या प्रत्येकाला स्वतःहून आवतन द्या. स्वतः घरच्या रायबाच लग्न सोडून कोंढाणायाच्या  लग्नाला या... आपल्या शिवाजीनं (बच्चुभाऊ) हाक  दिलीय, प्रत्येक तानाजीनं या, प्रत्येक बाजिप्रभून या, प्रत्येक मावळ्यान या... 

काळ्या आईच्या लेकरांसाठी, तिच्या प्रत्येकच लेकारान या...

आता मरणार नाही, लढणार आम्ही.


२३ सप्टेबर २०११ रोजी अमरावती येथे आ. बच्चुभाऊ कडू (संस्थापक अध्यक्ष: प्रहार युवाशक्ती संघटना) यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा महामोर्चा. 

चलो दसरा मैदान, अमरावती.

सोमवार, १९ सप्टेंबर, २०११

चलो दसरा मैदान, अमरावती.

खर तर त्या टुकार काँग्रेसवर माझे शब्द खर्च करण्याची माझी इच्छा नाही. पण माझ्या भारतीय बांधवांसाठी लिहित रहावेच लागेल. युवक काँग्रेस च्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत आणि काँग्रेस मधली घराणेशाहीची लोकशाही विरोधी प्रवृत्ती पुन्हा बाहेर येत आहे. यवतमाळ चा जिल्हाप्रमुख कोण तर माणिकरावांचा छोकरा, नागपुरात कोण तर दत्ताभाऊंचा पिटुकला...अन या सर्व वासरांत शहाणी, लंगडी गाय कोण, तर गांधीचा शेम्बडू... ज्याला स्वतःच्या ठोस भूमिकाही नाहीत. जवळपास सगळीकडे हेच. आलटून-पालटून जनतेचा रक्त शोषून घेण्याच्या संधी आप-आपसात वाटून घेणाऱ्या जळवांचा समुह. 

म्हणूनच लोकांनी निवडून दिलेले, लोकांसाठी चालणारे आणि लोकांद्वारेच (?) चालविले जाणारे सरकार केंद्रात आणि राज्यात असताना आपल्या रास्त मागण्यांसाठी - नव्हे तर जगण्याच्या अधिकारासाठी - कृषिप्रधान देशातील कास्तकारांना मरणाचीच वाट पहावी लागते. कुठे भगवा घेऊन खंडणी वसुली करणारे, तर कुठे लाळघोटेपणा करून, घराणेशाही करून लुटणारे. लुटल्या गेलाय तो सामान्य माणूस. अन सर्वात जास्त शेतकरी . आत्महत्या केल्यावरही त्याचा तोंडाला पाने पुसण्या पलीकडे केलंय तरी काय शासनकर्त्यांनी?
जणू आत्महत्या हि जगण्याचा अधिकार मिळविण्याची अट  असावी.आपल्याच देशात हा अन्याय आम्ही कास्तकारांची पोरं आता सहन करणार नाही.

आता मरणार नाही, लढणार आम्ही.


२३ सप्टेबर २०११ रोजी अमरावती येथे आ. बच्चुभाऊ कडू (संस्थापक अध्यक्ष: प्रहार युवाशक्ती संघटना) यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा महामोर्चा. 

चलो दसरा मैदान, अमरावती.
गुरुवार, १५ सप्टेंबर, २०११

मा. आ. श्री. बच्चुभाऊ कडू - समाजसेवकांना व प्रहारींना प्रेरणा देताना


"सार्वजनिक पाऊलवाट जेव्हा आपण तयार करतो, व्यक्तिगत पाऊलवाट आपोआपच तयार होत असते." - मा. आ. श्री. बच्चुभाऊ कडू


मा. आ. श्री. बच्चुभाऊ कडू - समाजसेवकांना व प्रहारींना प्रेरणा देताना

सोमवार, १२ सप्टेंबर, २०११

शेतकरी गर्जना - "आता मरणार नाही... लढणार आम्ही !!!"

जाती-धर्म-भाषा हे भेद विसरून सर्व शेतकर्यांनी, काळ्या आईच्या सर्व लेकरांनी एकत्र या-
शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांसाठी डेरा आंदोलन 
चला मुख्यमंत्र्यांच्या गावी- चलो  कराड ! चलो  कराड !! चलो  कराड !!!

चला शेतकर्यानो... उठा शेतमजुरांनो... उठा तरुणांनो... क्रांतीचे पाऊल टाकूया-

शेतकरी बंधुनो,
२३ सप्टेबर २०११ रोजी अमरावती येथे आ. बच्चुभाऊ कडू (संस्थापक अध्यक्ष: प्रहार युवाशक्ती संघटना) यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा महामोर्चा होत आहे.

१० जाने. रोजी नागपूरला प्रहारच्या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले व कापसाचे भाव वाढले.पण सरकार कोणत्या न कोणत्या प्रकारे शेतकर्याना नाडते. त्यामुळे आता सरकारचा पक्का बंदोबस्त करून खालील मागण्यांसाठी २३ सप्टेंबर ला अमरावती येथे महामोर्चा व तेथून असंख्य शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या गावी रवाना होतील व तेथे मागण्या मान्य होईपर्यंत घेराव घालतील. 


या आंदोलना विषयी शेतकरी भवन, माढेळी त. वरोरा, जिल्हा-चंद्रपूर येथे पूर्वतयारी मार्गदर्शन सभा-बैठक
दि. १७ सप्टेंबर रोजी दु. १२ वा.
प्रमुख उपस्थिती- १) श्री पप्पुभाऊ देशमुख, जिल्हाध्यक्ष- प्रहार संघटना
                           २) श्री रुपेशकुमार घागी, विदर्भ प्रमुख, प्रहार विद्यार्थी संघटना

अधिक माहितीसाठी संपर्क- ९२७०२७१५५८, ९७६५४४७४१३ 

रविवार, ११ सप्टेंबर, २०११

मा. आमदार बच्चुभाऊ कडू वरोरा येथे मार्गदर्शन करताना

मा. आमदार बच्चुभाऊ कडू वरोरा येथे मार्गदर्शन करताना. सामाजिक कार्यकर्त्यांनी कसे काम करायला पाहिजे याविषयी ते बोलताहेत... जरूर ऐकाव असं काही.

मंगळवार, २ ऑगस्ट, २०११

कधीपर्यंत ?

सोनिया गांधी, राहुलबाळ आणि प्रियांकाबेबी विश्वस्त असणाऱ्या राजीव गांधी ट्रस्ट ला हरयाणा सरकारने नियम धाब्यावर बसवून शेतकर्याची जमीन ढापली. अशा चोर गांधीना ते राजासारखे दिसतात म्हणून किंवा त्यांच्या आजोबांची पुण्याई म्हणून कधीपर्यंत डोक्यावर घेउन नाचणार?

जागे व्हा ! लढा !

बुधवार, १३ जुलै, २०११

...तुम्हीच शिल्पकार !

पुन्हा एकदा बॉम्ब-स्फोट. दहशतवाद्यांचा स्वतःच्या हाताने गळा चिरावा अन त्या रक्तांन या आभाळावर लिहून टाकावं, " खबरदार, हे स्वतंत्र भारताचं आभाळ आहे." पण ज्या देशातील लोक शेपूट घालण्याच्या सवइचे, स्वतःच्या स्वार्थाचे आणि स्वतः काही बनल्याशिवाय देशाकडे लक्ष कसा देऊ अशा घाणेरड्या गुलाम वृत्तीचे असतील तिथे कसाब सारखे लोक येऊन घाण करतीलच. गुलामांच्या देशात स्वातंत्र्याचे काय पोवाडे गायचे? अन हि फक्त भौतिक सुखाची गुलामगिरीच नव्हे तर वैचारिक दिवाळखोरी आणि प्रश्न समजून घेण्याच्या वैचारिक पात्रतेचा आणि तयारीचा अभाव आहे. 

गे मायभू तुझे मी, फेडीन पांग सारे .....

आहे का आज खरच कोणाची हिम्मत ? प्रसंगी रक्ताचे पाट वाहवून या मातीचा स्वाभिमान जपण्याची ? स्वतःच्या घर, कुटुंब यांना दुय्यम स्थान देऊन  देशकार्यासाठी झोकून घेण्याची? 

लढा !!!शनिवार, ९ जुलै, २०११

आम्ही सारेच सुभाष खारोडे...

 पिक भरपूर झालं पण भाव मिळेना, सरकारचं धोरण शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याच काम व्यवस्थित करताय. हा एका पक्षाचा नाही तर, राज्यकर्ते आणि सामान्य जनता यांच्यातील दरीचा problem आहे. शेतकरी संघटित नाहीत, पिटून उठत नाही म्हणूनच हा खेळ चालतोय. नुकतीच अकोला जिल्ह्यातील रौंदळा (ता. तेल्हारा) येथील शेतकऱ्याने  आत्महत्या केली. नव्हे जिवंत शेतकऱ्याकडे कोणी लक्ष देईना म्हणून आपल्या लाखो बांधवाच्या समस्या मांडण्यासाठी बलिदान दिले. पदवीधर आणि माजी सरपंच असलेले श्री खरोडे यांनी आत्महत्येपूर्वी, केंद्र व राज्य शासनाच्या लहरी धोरणामुळे शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळे त्रासून जीवन यात्रा संपवित असल्याचे पत्र लिहून ठेवले आहे, तेही स्टेम्प - पेपर वर.

देशात मुबलक प्रमाणात अन्नसाठा असताना शासन ऐन मोसमात परदेशातून तेल, धन्य इत्यादी आयात करून शेतमालाचे भाव पाडते. शेतकऱ्यांनी कधीपर्यंत हे सहन करावं ? भाव-वाढले कि मूर्ख विरोधीपक्ष थुई -थुई नाचतो. पेट्रोल साठी बैल-बंदीचे मोर्चे काढतो पण त्याच बैलबंडीच्या  मालकासाठी, शेतकऱ्यासाठी काय करतो ? भाजीचे भाव वाढले म्हणून भाजीचे हार घालून विधान-सभेत जाणाऱ्या मनसेच्या आमदारांना शेतकऱ्यांच्या व्यथा दिसत नाही? भाव वाढून शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळाले तर तुमच्या का पोटात दुखतंय ?  

आता सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित यावं आणि लढावा. सर्व पक्षांतील, संस्थांतील लोकांनी आता एकत्रित येवून लढणे आवश्यक आहे. शेतकऱ्यासाठी सरकारचे योग्य धोरण ठरावे हीच मागणी खरोडे यांनी मरण्यापूर्वी लिहून ठेवली आहे. सरकार जबाबदार आहे. आता धोरण बदलण्यासाठी आपणच लढा उभारणे आवश्यक आहे ...लढा 

शुक्रवार, ८ जुलै, २०११

श्रीमान राहुल गांधी, तुम्हाला लाज वाटत नाही काय ?

उत्तर प्रदेशाला दलाल चालवत आहेत, उत्तर प्रदेश सरकार शेतकरी हिताच्या विरोधात आहे अशा आशयाचे संदेश आजकाल राहुल गांधी देत आहेत. बरोबरही असेल कदाचित. पण, राहुल बाळा, हे एका शेंबड्या पोरानं दुसऱ्याला शेंबडा म्हणण्यासारख नाही का?

सारा कर्मचारी वर्ग सहाव्या वेतन आयोगाचे फायदे भोगत असताना आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे लोक जागतिकीकरणाच्या फायद्यात चिंब भिजत असताना कोरडा राहिलाय तो फक्त शेतकरी आणि शेतमजूर. आणि शेतकऱ्यांच भलं करू शकणारा स्वामिनाथन आयोग वर्षनुवर्षे धूळ खात पडून राहतो. राजकुमार, किती दिवस स्टंटबाजी करत फिरणार ? आंतर राष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव सात हजाराच्या आसपास अन इथे हमीभाव तीन हजार? प्रहारच्या आंदोलनामुळे कशीबशी निर्यातबंदी हटली. कसाबसा शेतकरी जगायला लागला आणि तामिळनाडू, बंगालच्या निवडणुकांनी घात केला. ज्यांच्याकडून पैसा घेउन तुम्ही आणि तुमचे मित्र पक्ष निवडणुका लढता त्या ३००-४०० कपडा मिल मालकांच्या फायद्यासाठी निर्यातबंदी पुन्हा लादली गेली. पडत्या भावाने कापूस खरेदी होऊ लागला. मिल मालकांना स्वस्तात कापूस, जास्त नफा.  निर्यातबंदी पुन्हा लादणाऱ्या आपल्याच पक्षातील मित्रपक्षातील सहकार्यांना रोकु न शकणारे तुम्ही उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी ऐन निवडणुकीच्या आसपास खूप धावून आले. धन्यवाद ! तुम्ही तुमची नाटकबाजी सुरु ठेवा... आमची भाबडी जनता उद्या तुम्हाले पंतप्रधान बनविल.नाचा.

बेभरवश्याचा पाऊस, सतत दगा देणारे बाजारभाव, कर्जाचे डोंगर आणि रक्त शोषणारे 'लोकांनी, लोकांसाठी, लोकांनीच चालवलेले' सरकार... या सर्वांत, शेतीप्रधान देशातील शेतकरी रक्ताचे आसू रडतोय. धोरणात्मक निर्णय घेऊ शकणारे तुम्ही मतांसाठी रस्त्यावर नौटंकी आणि नाचगाण करताय. भले शाब्बास. आन या बालसुलभ चाळ्यांच कौतुकही फार. हि कथा एका पिकाची किवा एका राज्याची किंवा एका शेतकऱ्याची नाही - सगळीकडेच स्वार्थापोटी शेतकऱ्याचा बळी देण्यात आलाय. महिन्याचा पगार उचलून शेतकऱ्यांच्या अगतिकतेला दुबळेपणा म्हणवणार्या माझ्या मित्रांनो जरा जमिनीवर या... या मातीत तुमचीही मुळं घट्ट रुतू द्या... मगच तुम्हाला या आईच न तिच्या लेकरांचा दुखं कळेल. 

आता शेतकऱ्याचा मरणाला जबाबदार असा कोणीच जगला नाही पाहिजे. आता पोशिंदा पहिले जगल ... लढा.