रविवार, २५ सप्टेंबर, २०११

बळीराजा दंड थोपटतो तेव्हा...

वर्षानुवर्षे चालत आलेल्या अन्यायाविरुद्ध शेतकरी पेटला. प्रहार चे संस्थापक-अध्यक्ष आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात, देशभरातील शेतकरी नेत्यांच्या साक्षीनं सुरु झाला महासंग्राम..." भिक नको, ... घेऊ घामाचे दाम! "

थोडक्यात आत्ता पर्यंतचा वृत्त्तांत

२३ सप्टेंबर. दसरा मैदान, अमरावती 
४० हजार शेतकरी एका आवाजात ललकारी देत होते... "आता मरणार नाही, लढणार आम्ही!"
शेतमजुरांची मजुरी व शेतकऱ्यांचे उत्पन्न सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे कमीत-कमी ३०० रु. रोज व्हायलाच पाहिजे. त्याकरिता पेरणी-ते-कापणी पर्यंत सर्व कामे रोजगार हमी योजनेतून घ्या, सर्व जमिनीला सिंचनाची व्यवस्था करा, हमीभाव इ. अनेक मागण्यांतून शेतकऱ्याला सन्मानान जगता यावे, त्याच्या घामाच्या धारांसोबत अन्याय होऊ नये अशा मागण्या करण्यात आल्या. सुमारे आठ हजार शेतकरी आपलं गार्हाण घेऊन मुख्यमंत्र्यांच्या गावाकडे झाले रवाना. पूर्ण अमरावती दुमदुमली... बळीच राज्य येऊ दे !    

२४ सप्टेंबर.
नांदगाव(खं.)- कारंजा- सेलू बाजार- मालेगाव- मेहकर-सिंदखेड राजा
भरगच्च सभा, भारलेलं वातावरण. सगळीकडे बळीराजाचा दबदबा.आ. सुभाष झनक यांचा आंदोलनास पाठींबा.
दिवसभरात अनेक सभा घेण्यात आल्या. सिंदखेड राजा येथे मुक्काम. 

२५ सप्टेंबर.
सिंदखेड राजा -(पूजन व सभा)-जालना- औरंगाबाद- नेवासा- देवगाव(मुक्काम.)  
शेतकर्यांचा वाढता प्रतिसाद. हक्काच्या लढाईसाठी गरजणारा शेतकरी. सरकारचे डावपेच सुरु.
सातारा जिल्ह्यात सरकारने जमावबंदी लागू केली. 
रात्री बच्चूभाऊंना अटक करण्यासाठी पोलीस आले असताना, शेतकरी माय-माउलींनी   पदर खोचला..."न्या आमच्या भाऊंना पकडून--- आम्ही मुक्कामास असलेल्या तिसर्या मजल्यावरूनच खाली उडी टाकू---" बच्चूभाऊंसाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी हा प्रतिसाद पाहून पोलिसाना ग्यावी लागली माघार...
आता बळीचा राज्य येणार.

आजचा कार्यक्रम 
२६ सप्टेंबर.
शिकारपूर- चाकण- देहू(रक्तदान शिबीर)-पुणे- सातारा
आज सभा व रक्तदान शिबीर घेण्याला सरकार विरोध करतंय. प्रहार रक्त देऊन क्रांती करणारच- रक्तदान शिबीर होणारच... महाराष्ट्रात आजपर्यंत सर्वात जास्त रक्तदान करून रुग्णांना वाचवणारी संघटना आज शेतकऱ्याच्या आंदोलनासाठी पुन्हा रक्तदान करणार...

आणि गरज पडलींच तर उद्याही रक्त...

शेतकऱ्यांच्या हक्काच्या लढाईत सामील व्हा--- पुणे परिसरातील मित्रहो--- आज दु. चार वाजता देहू येथे येऊन आंदोलनास आपलाही पाठींबा द्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा