दोन सख्या भावांत जेव्हा वाटणी होते, तेव्हा इंच भराच्या अन्यायाच्या फक्त शंकेवरून एक भाऊ दुसर्यावर धावून जातो. वावर पडो, पण धुर्यासाठी लढू - अशी आमची लढाऊ वृत्ती. पण जेव्हा मायबाप सरकार पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या दोन ठिकाणच्या शेतकरी भावांना दोन वेगळ्या मापात तोलते तेव्हा आम्ही या सरकारवर का धावून जात नाही. आमच्या नोकरशहा, कर्मचारी भावाला तुपाशी खाऊ घालताना आम्ही कास्तकार उपाशी आहोत हे या सरकारला दिसत नाही का? खर तर शेतकरी कुठलाही असो, कमी अधिक प्रमाणात नाडल्याच जात आहे. पण ज्याच्यावर सगळ्यात जास्त अन्याय झाला तो आमचा लढाऊ वैदर्भीय शेतकरी आताही जागणार नाही का ?
चला उठा , दाखवून द्या या काळ्या आईला... तिच्या लेकरांत अजूनही रग आहे.
चला, आपल्या संपर्कातल्या प्रत्येकाला स्वतःहून आवतन द्या. स्वतः घरच्या रायबाच लग्न सोडून कोंढाणायाच्या लग्नाला या... आपल्या शिवाजीनं (बच्चुभाऊ) हाक दिलीय, प्रत्येक तानाजीनं या, प्रत्येक बाजिप्रभून या, प्रत्येक मावळ्यान या...
काळ्या आईच्या लेकरांसाठी, तिच्या प्रत्येकच लेकारान या...
आता मरणार नाही, लढणार आम्ही.
२३ सप्टेबर २०११ रोजी अमरावती येथे आ. बच्चुभाऊ कडू (संस्थापक अध्यक्ष: प्रहार युवाशक्ती संघटना) यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा महामोर्चा.
चलो दसरा मैदान, अमरावती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा