पिक भरपूर झालं पण भाव मिळेना, सरकारचं धोरण शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याच काम व्यवस्थित करताय. हा एका पक्षाचा नाही तर, राज्यकर्ते आणि सामान्य जनता यांच्यातील दरीचा problem आहे. शेतकरी संघटित नाहीत, पिटून उठत नाही म्हणूनच हा खेळ चालतोय. नुकतीच अकोला जिल्ह्यातील रौंदळा (ता. तेल्हारा) येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली. नव्हे जिवंत शेतकऱ्याकडे कोणी लक्ष देईना म्हणून आपल्या लाखो बांधवाच्या समस्या मांडण्यासाठी बलिदान दिले. पदवीधर आणि माजी सरपंच असलेले श्री खरोडे यांनी आत्महत्येपूर्वी, केंद्र व राज्य शासनाच्या लहरी धोरणामुळे शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळे त्रासून जीवन यात्रा संपवित असल्याचे पत्र लिहून ठेवले आहे, तेही स्टेम्प - पेपर वर.
देशात मुबलक प्रमाणात अन्नसाठा असताना शासन ऐन मोसमात परदेशातून तेल, धन्य इत्यादी आयात करून शेतमालाचे भाव पाडते. शेतकऱ्यांनी कधीपर्यंत हे सहन करावं ? भाव-वाढले कि मूर्ख विरोधीपक्ष थुई -थुई नाचतो. पेट्रोल साठी बैल-बंदीचे मोर्चे काढतो पण त्याच बैलबंडीच्या मालकासाठी, शेतकऱ्यासाठी काय करतो ? भाजीचे भाव वाढले म्हणून भाजीचे हार घालून विधान-सभेत जाणाऱ्या मनसेच्या आमदारांना शेतकऱ्यांच्या व्यथा दिसत नाही? भाव वाढून शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळाले तर तुमच्या का पोटात दुखतंय ?
आता सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित यावं आणि लढावा. सर्व पक्षांतील, संस्थांतील लोकांनी आता एकत्रित येवून लढणे आवश्यक आहे. शेतकऱ्यासाठी सरकारचे योग्य धोरण ठरावे हीच मागणी खरोडे यांनी मरण्यापूर्वी लिहून ठेवली आहे. सरकार जबाबदार आहे. आता धोरण बदलण्यासाठी आपणच लढा उभारणे आवश्यक आहे ...लढा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा