मंगळवार, १९ जुलै, २०११
बुधवार, १३ जुलै, २०११
...तुम्हीच शिल्पकार !
पुन्हा एकदा बॉम्ब-स्फोट. दहशतवाद्यांचा स्वतःच्या हाताने गळा चिरावा अन त्या रक्तांन या आभाळावर लिहून टाकावं, " खबरदार, हे स्वतंत्र भारताचं आभाळ आहे." पण ज्या देशातील लोक शेपूट घालण्याच्या सवइचे, स्वतःच्या स्वार्थाचे आणि स्वतः काही बनल्याशिवाय देशाकडे लक्ष कसा देऊ अशा घाणेरड्या गुलाम वृत्तीचे असतील तिथे कसाब सारखे लोक येऊन घाण करतीलच. गुलामांच्या देशात स्वातंत्र्याचे काय पोवाडे गायचे? अन हि फक्त भौतिक सुखाची गुलामगिरीच नव्हे तर वैचारिक दिवाळखोरी आणि प्रश्न समजून घेण्याच्या वैचारिक पात्रतेचा आणि तयारीचा अभाव आहे.
गे मायभू तुझे मी, फेडीन पांग सारे .....
आहे का आज खरच कोणाची हिम्मत ? प्रसंगी रक्ताचे पाट वाहवून या मातीचा स्वाभिमान जपण्याची ? स्वतःच्या घर, कुटुंब यांना दुय्यम स्थान देऊन देशकार्यासाठी झोकून घेण्याची?
लढा !!!
शनिवार, ९ जुलै, २०११
आम्ही सारेच सुभाष खारोडे...
पिक भरपूर झालं पण भाव मिळेना, सरकारचं धोरण शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याच काम व्यवस्थित करताय. हा एका पक्षाचा नाही तर, राज्यकर्ते आणि सामान्य जनता यांच्यातील दरीचा problem आहे. शेतकरी संघटित नाहीत, पिटून उठत नाही म्हणूनच हा खेळ चालतोय. नुकतीच अकोला जिल्ह्यातील रौंदळा (ता. तेल्हारा) येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली. नव्हे जिवंत शेतकऱ्याकडे कोणी लक्ष देईना म्हणून आपल्या लाखो बांधवाच्या समस्या मांडण्यासाठी बलिदान दिले. पदवीधर आणि माजी सरपंच असलेले श्री खरोडे यांनी आत्महत्येपूर्वी, केंद्र व राज्य शासनाच्या लहरी धोरणामुळे शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळे त्रासून जीवन यात्रा संपवित असल्याचे पत्र लिहून ठेवले आहे, तेही स्टेम्प - पेपर वर.
देशात मुबलक प्रमाणात अन्नसाठा असताना शासन ऐन मोसमात परदेशातून तेल, धन्य इत्यादी आयात करून शेतमालाचे भाव पाडते. शेतकऱ्यांनी कधीपर्यंत हे सहन करावं ? भाव-वाढले कि मूर्ख विरोधीपक्ष थुई -थुई नाचतो. पेट्रोल साठी बैल-बंदीचे मोर्चे काढतो पण त्याच बैलबंडीच्या मालकासाठी, शेतकऱ्यासाठी काय करतो ? भाजीचे भाव वाढले म्हणून भाजीचे हार घालून विधान-सभेत जाणाऱ्या मनसेच्या आमदारांना शेतकऱ्यांच्या व्यथा दिसत नाही? भाव वाढून शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळाले तर तुमच्या का पोटात दुखतंय ?
आता सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित यावं आणि लढावा. सर्व पक्षांतील, संस्थांतील लोकांनी आता एकत्रित येवून लढणे आवश्यक आहे. शेतकऱ्यासाठी सरकारचे योग्य धोरण ठरावे हीच मागणी खरोडे यांनी मरण्यापूर्वी लिहून ठेवली आहे. सरकार जबाबदार आहे. आता धोरण बदलण्यासाठी आपणच लढा उभारणे आवश्यक आहे ...लढा
शुक्रवार, ८ जुलै, २०११
श्रीमान राहुल गांधी, तुम्हाला लाज वाटत नाही काय ?
उत्तर प्रदेशाला दलाल चालवत आहेत, उत्तर प्रदेश सरकार शेतकरी हिताच्या विरोधात आहे अशा आशयाचे संदेश आजकाल राहुल गांधी देत आहेत. बरोबरही असेल कदाचित. पण, राहुल बाळा, हे एका शेंबड्या पोरानं दुसऱ्याला शेंबडा म्हणण्यासारख नाही का?
सारा कर्मचारी वर्ग सहाव्या वेतन आयोगाचे फायदे भोगत असताना आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे लोक जागतिकीकरणाच्या फायद्यात चिंब भिजत असताना कोरडा राहिलाय तो फक्त शेतकरी आणि शेतमजूर. आणि शेतकऱ्यांच भलं करू शकणारा स्वामिनाथन आयोग वर्षनुवर्षे धूळ खात पडून राहतो. राजकुमार, किती दिवस स्टंटबाजी करत फिरणार ? आंतर राष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव सात हजाराच्या आसपास अन इथे हमीभाव तीन हजार? प्रहारच्या आंदोलनामुळे कशीबशी निर्यातबंदी हटली. कसाबसा शेतकरी जगायला लागला आणि तामिळनाडू, बंगालच्या निवडणुकांनी घात केला. ज्यांच्याकडून पैसा घेउन तुम्ही आणि तुमचे मित्र पक्ष निवडणुका लढता त्या ३००-४०० कपडा मिल मालकांच्या फायद्यासाठी निर्यातबंदी पुन्हा लादली गेली. पडत्या भावाने कापूस खरेदी होऊ लागला. मिल मालकांना स्वस्तात कापूस, जास्त नफा. निर्यातबंदी पुन्हा लादणाऱ्या आपल्याच पक्षातील मित्रपक्षातील सहकार्यांना रोकु न शकणारे तुम्ही उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी ऐन निवडणुकीच्या आसपास खूप धावून आले. धन्यवाद ! तुम्ही तुमची नाटकबाजी सुरु ठेवा... आमची भाबडी जनता उद्या तुम्हाले पंतप्रधान बनविल.नाचा.
बेभरवश्याचा पाऊस, सतत दगा देणारे बाजारभाव, कर्जाचे डोंगर आणि रक्त शोषणारे 'लोकांनी, लोकांसाठी, लोकांनीच चालवलेले' सरकार... या सर्वांत, शेतीप्रधान देशातील शेतकरी रक्ताचे आसू रडतोय. धोरणात्मक निर्णय घेऊ शकणारे तुम्ही मतांसाठी रस्त्यावर नौटंकी आणि नाचगाण करताय. भले शाब्बास. आन या बालसुलभ चाळ्यांच कौतुकही फार. हि कथा एका पिकाची किवा एका राज्याची किंवा एका शेतकऱ्याची नाही - सगळीकडेच स्वार्थापोटी शेतकऱ्याचा बळी देण्यात आलाय. महिन्याचा पगार उचलून शेतकऱ्यांच्या अगतिकतेला दुबळेपणा म्हणवणार्या माझ्या मित्रांनो जरा जमिनीवर या... या मातीत तुमचीही मुळं घट्ट रुतू द्या... मगच तुम्हाला या आईच न तिच्या लेकरांचा दुखं कळेल.
आता शेतकऱ्याचा मरणाला जबाबदार असा कोणीच जगला नाही पाहिजे. आता पोशिंदा पहिले जगल ... लढा.
रविवार, ३ जुलै, २०११
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)