शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१३

प्रहारच्या २ ऑक्टोबर २०१३ रोजी झालेल्या आंदोलनाचे सुयश

३ ऑक्टोबर ला मंत्रालयात मा. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीचा वृत्तांत. कृपया फाईल वाचावी


गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१३

आमच्या अपंग-अनाथांची,शेतकरी-कष्टकर्यांची दुःख घेऊन जा गे मारबत...

दरवर्षीप्रमाणे उद्या अगदी पहाटेला आमचे गावा-गावातील बांधव गावातली सारी मरगळ, दुःख, संकटं आम्ही प्रतिकात्मक रुपाने गावातुन हद्दपार करु. मारबत हाकलुन वाईट प्रवृत्ती व शक्तिंपासुन स्वतःचे रक्षण करणार. परंतु माझ्या शेतकरी बांधवांनो, माझ्या अपंग बांधवांनो... बहुसंख्येने आणि एकदिलाने लढलं तरच टळल ईडा-पिडा आणि येईल बळीचं राज्य.

आपल्या भोवतालच्या १०-२० प्रश्नांपैकी २-३ सोपे प्रश्न सोडवायचे आणि आपल्या कामाचा डंका ठोकायचा, असे अनेक नेते आणि संघटना आपल्या भोवताल असतात. त्यांचा प्रसारमाध्यमे खुप गाजावाजाही करतात. एखाद्या कंपनिच्या इतक्या गुंतवनुकित इतका नफा अशाप्रमाणेच एक साचेबद्ध समाजसेवा. पण अशाही पैरिस्थितीत एक संघटना अशी असते जी परिणाम कधी येतील याचा विचार न करता सामान्यांच्या जगण्याच्या हक्कांसाठी लढत असते- प्रहार तिचे नाव.

अगदी संयमाने इंच-इंच लढवत गेल्या दोन वर्षांपासुन प्रहारचे शेतकरी आंदोलन व सुमारे एक वर्षांपासुन प्रहार अपंग क्रांती आंदोलन पुढे सरकत आहे. आता २ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे प्रहार होईल... खर्या वंचितांची शोषितांची लढाई.तुम्ही येणार कि नाही... मारबत हाकलायला?

आझाद मैदान, मुंबई

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१३

दिन-दुबळ्यांची सेवा हीच ईश्वरसेवा : बच्चु कडु

देव असलाच तर तो माणसात आहे. दिन-दुबळ्यांची सेवा हीच ईश्वरसेवा असं तुकोबांपासुन तर गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, स्वामी विवेकानंद सांगुन गेले. परंतु अशा गोष्टी फक्त् पुस्तकांतुन वाचुन  आणि लिहुन खुश असणारे काही लोक असतात. स्वतःच्या रोजच्या जीवनातुन-जीवनशैलीतुन असे आदर्श घालुन देणारे लोकही असतात- ते स्वतःच अशा तत्वज्ञानाचं चालतं-बोलतं पुस्तक असतात. बच्चु उर्फ ओमप्रकाश कडू हे असंच एक व्यक्तिमत्व. एखादा माणुस एकाच आयुष्यात इतकं काम करतो कि त्याचं कर्तुत्व शब्दांत मांडणं कुणाच्याच आवाक्यात रहात नाही. या ठिकाणी मी आ. बच्चु कडु यांचे काही विचार आणि आयुष्यातील प्रसंग सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.

आमदार असताना कुठल्यातरी नुकत्याच उगवलेल्या बाबाच्या जन्मोत्सवात बच्चु कडु यांना जनतेनी बोलाविले. हजारो लोक तिथे असणार, आणि तिथे गेल्यास तुमच्या समर्थकांची संख्या वाढणार परंतु स्वार्थाचा विचार न करता अंधश्रद्धा नाकारणारा आणखी एखादा आमदार आहे का हो महाराष्ट्रात ? स्टेजवर नकला करुन आणि मिडीया विकत घेउन आम्ही अंधश्रद्धाविरोधी आहोत हे सांगणारे लोकांना आवडतात, पण अंधश्रद्धेच्या विरोधात खर्या अर्थानं लढणारा आमदार म्हणजे बच्चु कडू. पण ही काही एकच घटना नव्हे. ते आमदार व्हायच्या आधी निवडणुक प्रचारादरम्यान एका गावातील नागरीकांनी त्यांना गावातील मतिमंदाकडे नेले. गावातील लोक त्याला दैवी शक्ती असलेला अवलिया बाबा समजत होते. त्याच्या शिव्यांना प्रसाद मानत होते. परंतु मतांसाठी लोकांच्या अंधश्रद्धांना शरण जावुन सुधारणांना अडसर ठरणे आ. कडु यांना मान्य नव्हते. त्यांच्या बाजुचे गाव त्यांच्या विरोधात गेले, अगदी थोड्या फरकाने त्यांना निवडणुक हरावी लागली. पण जिंकणं आणि योग्य यापैकी एकच मिळाणार असेल तर योग्य स्विकारायला मर्दाचं काळीज लागतं.

आ. कडु लहान असतांना त्यांच्या आईने देविला नवस करण्यासाठी दिलेल्या पैशांतुन त्यांनी एका भिकारी म्हातारीची सेवा केली. म्हणुन ते म्हणतात कि एवढीच श्रद्धा असते तर लोक तिरुपतीला हात का कापुन वाहात नाहित? केस पुन्हा येतील म्हणुन माहिती असतं, म्हणुनच गलिच्छ केसांचे  ढिगच्या ढिग जमतात तिथे. कमी पैसे असले तर शिर्डी, जास्त असले की तिरुपती. सगळळ सोईप्रमाणे. उपवास करुन कुण्या उपाशी माणसाला खाऊ घालणार असाल तर ठिक, पण उपवासाच्या नावावर दुप्पट खातात लोक. न स्वतःला आरोग्याचा फायदा, न भुकेल्याला अन्नाचा. देशासाठी बलिदान दिलेल्या भगतसिंगाच्या गावी कुणी जाणार नाही, सोळाव्या वर्षी देशासाठी ब्रिटीशांच्या गोळीने शहीद झालेल्या चिमुरच्या बालाजी रायपुरकर यांचे नावही तिथल्या पालकमंत्र्याला माहिती नसते, पण कुण्या भोंदुबाबाच्या काल्यासाठी आजही लाखो रुपये आणि हजारो लोक जमतात. पण आ. बच्चुभाऊ कडु यांचं आजही आवाहन आहे, या, तिरंगा घ्या हाती. अंधश्रद्धा सोडा आणि देशकार्याला आणि दीन-दुबळ्यांच्या सेवेला वाहुन घ्या.