शुक्रवार, २९ जून, २०१२

१ जुलै रोजी अमरावती येथे प्रहारचा कार्यकर्ता मेळावा


 प्रहारचा कार्यकर्ता मेळावा रविवार दिनांक १ जुलै २०१२ रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, अमरावती येथे आयोजित केलेला आहे. प्रसिद्ध वक्ते शिवरत्न शेटे यांचे 'शिवराय आज असते तर...' या विषयावर व्याख्यान सकाळी ११.३० ला आयोजित केले आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी सतत शिवरायांचे नाव वापरणारी अनेक मंडळी या महाराष्ट्रात आहेत. परंतु जनतेच्या हिताची नीती राबवणारे उत्तम प्रशासक, रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवराय सामन्यापर्यंत कधीच प्रभावीपणे पोहचविण्यात आलेले नाहीत. म्हणूनच शिवरायांचे शेतकरी, मुसलमान, भ्रष्टाचार याविषयीचे खरे विचार कधीच जन-सामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन 'स्वराज्याची' घडी नीट बसविण्याएवजी, सारा देश सामन्यांचे प्रश्न सोडून, टी.आर.पी. वाढविणाऱ्या आणि प्रसिद्धी देणाऱ्या प्रश्नांचे राजकारण  करत राहतो. खरे शिवराज कार्यकर्त्यांसमोर उभे करण्याचा प्रयत्न या व्याख्यानाच्या माध्यमातून होणार आहे. यावेळी प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे व आ. बच्चू कडू हे प्रामुख्याने उपस्थित असतील व मेळाव्यास मार्गदर्शन करतील.

जून महिन्यात गडचिरोलीत रक्तदान, राज्यात ठिकठिकाणी मेळावे व आझाद मैदान येथे उपोषण करून आ.बच्चू कडू व प्रहारच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचे काही प्रश्न मार्गी लावले. या आंदोलनानंतर प्रहारचा हा पहिलाच मेळावा. विदर्भातील विविध जिल्ह्यातून प्रहारचे शेकडो कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित असतील.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा