बुधवार, ६ जून, २०१२

कृषिमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांची बच्चू कडू यांच्या आमरण उपोषणास भेट


शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी आ. बच्चू कडू यांनी १ जून रोजी गडचिरोली येथे रक्तदान करून रालीस सुरुवात केली.महाराष्ट्रातील विविध शहरांना-गावांना भेटी देत   ते ४ जून रोजी मुंबईत पोहचले. त्याच दिवशी , ४ जून रोजी त्यांनी आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषणास सुरुवात केली. शरीराची रक्तदान व प्रवासामुळे झालेली झीज भरून निघायच्या आधीच त्यांनी या उपोषणाला सुरुवात केली. देशाला अन्न पुरविण्यासाठी मातीत रक्त आटवूनही  ज्याच्या जगण्याची दैना होते, ज्याची झीज होते त्या शेतकऱ्यांच्या व्यथा शासनाच्या दगडी काळजापर्यंत पोचविण्यासाठी त्यांनी या उपोषणाला सुरुवात केली. 

आज ६ जून रोजी महाराष्ट्राचे कृषिमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांनी उपोषण स्थळी भेट देऊन बच्चू कडू व इतर कार्यकर्त्यांशी चर्चा केली. आर. पी. आय. चे राजेंद्र गवई  यांनी आज बच्चू कडू यांच्यासोबत त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ स्वतः  एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन केले. आज  आ. बाळा नांदगावकर,आ.  शरद पाटील , आ. वीरेंद्र जगताप, आ. बळीराम शिरसकर, आ. अनिल बोंडे, आ. अनिल अण्णा गोटे, आ. वसंतराव खोटरे, आ. दीपकराव केसरकर आदींनी शुभेच्छा भेटी दिल्या. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा