रविवार, ३ जून, २०१२

धुळे येथील जाहीर सभेत आ. शरद पाटील तसेच शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रप्रमुख रवी देवांग यांचा बच्चू कडू यांच्या शेतकरी आंदोलनास पाठींबा शेतकरी आंदोलनास पाठींबा


गडचिरोली येथे रक्तदान करून मुंबईकडे निघालेल्या शेतकरी रालीचे आज ३ जून रोजी धुळे येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. आ.बच्चू कडू शेतकरी--शेतमजूर -कष्टकरी-प्रकल्पग्रस्त- अनुशेष-गावातील गोरगरीब यांचा लढा पुढे नेताना ४ जून रोजी आझाद मैदान मुबई येथे आमरण  उपोषणास सुरुवात करीत आहेत.  या आंदोलनास धुळे जिल्हा शिवसेना व असंख्य कोरडवाहू शेतकऱ्यांच्या वतीने पाठींबा देण्यासाठी जाहीर सभा घेण्यात आली आ. बच्चू कडू यांनी सुरु केलेली हि लढाई सर्वसामान्य शेतकऱ्यांची लढाई आहे. गोरगरिबांची लढाई आहे. संघटीतपणे धोरणात्मक बदल घडविण्यासाठी आता शेतकऱ्यांनी एकत्रित येणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या या लढाईत आ. शरद पाटील यांनी आ. बच्चू कडू यांच्या खांद्यास खांदा लावून लढण्याचे आश्वासन दिले.

यावेळी  धुळे जिल्ह्यातील अनेक नेत्यांसह आ. शरद पाटील यांनी आ. बच्चू कडू यांना 'रुमने' देऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी सक्रीय सहभागाचे आश्वासन दिले.  


सरकार शेतकऱ्यांची सतत पिळवणूक करीत आहे. खरे म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या या  आत्महत्या नसून सरकारचे शेतकरी विरोधी धोरणाने केलेल्या हत्याच आहेत. आधी डेरा आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही कोरडवाहू शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या मान्य करून घेतल्या. शेतकऱ्यांच्या सुगीच्या दिवसाची हि सुरुवात आहे. परंतु अजूनही अनेक महत्वाच्या व जिव्हाळ्याच्या मागण्या मान्य व्हायच्या आहेत. यासाठी आम्ही मुंबईत जी लढाई सुरु करतोय, त्याची आग शेतकऱ्यांनी गाव-गाव पर्यंत पोचवावी. असे आवाहन बच्चू कडू यांनी केले.शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रप्रमुख रवी देवांग यांनीही बच्चू कडू यांच्या शेतकरी आंदोलनास पाठींबा दिला. 

या सभेप्रसंगी आ. बच्चू कडू , शरद पाटील यांच्यासह  प्रहारचे विदर्भाप्रमुख संजय देशमुख, अतुलभाऊ सोनावणे, शिवसेना जिल्हाप्रमुख धुळे, शेतकरी नेते रवी देवांग , लीलानंद माली, धुपेंद्र लांगे , प्रहारचे प्रवीण हिंडवे, मंगेश देशमुख, गजू कुबडे, प्रफुल डाफ आदी मान्यवर उपस्थित होते.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा