* तात्या टोपे यांच्या स्मारकास व वंशाजांस भेट ,योगेश टोपे या कॅन्सर ग्रस्त वंशाजास प्रहार तर्फे १०,०००/- रुपयांची मदत
* देवापेक्षाही देशासाठी लढणारा यांची स्मारके तीर्थक्षेत्रे व्हावीत
* तात्या टोपे यांचे स्मारक राष्ट्रीय स्मारक घोषित व्हावे व तिथे संग्रहालय व्हावे
* यात्रा भगत सिंगांच्या गावी रवाना
आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहारची क्रांती यात्रा १७ नोव्हेंबर रोजी चिमूर ( जिल्हा-चंद्रपूर ) येथील शहीद स्मारकास भेट देऊन हुसैनिवाला (पंजाब ) येथे रवाना झाली. हुसैनिवाला या ठिकाणी भगतसिंग. सुखदेव व राजगुरु यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. चिमूर येथे प्रहारचे संजय देशमुख (विदर्भ प्रमुख ) , रुपेश घागी (विद्यार्थी संघटना- विदर्भ प्रमुख ), इतर कार्यकर्ते तसेच युवा शक्ती संघटनेचे कार्य कर्ते हजर होते. ब्रिटिशांशी लढताना शहीद झालेल्या अनेक हुतात्म्यांचे स्मारक दूर्लक्षित अवस्थेत आहे . चिमूर येथील स्मारकाचे सौन्दर्यी करनाचे काम प्रहार संघटना लवकरच सुरु करणार आहे.
त्यानंतर क्रांती यात्रा शिवपुरी (मध्य प्रदेश) येथे आली . १८५७ च्या महासमरात सहा राज्यांमध्ये इंग्रजांना सळो कि पळो करून सोडणारे महापराक्रमी तात्या टोपे यांना इथे फाशी देण्यात आली होती . यांचे स्मारक आणि वंशजही दुर्लक्षित आहे. आर्थिक अडचणीत असलेले टोपे कुटुंबीय यांचीही भेट आ. कडू यांनी घेतली घेतली. कुटुंबातील योगेश टोपे या कॅन्सर ग्रस्त वंशाजास प्रहार तर्फे १०,०००/- रुपयांची करण्यात आली . येथील तुरुंगाधीकार्यांची भेट घेऊन तात्या टोपे यांना ठेवण्यात आलेली कारागृहाची खोलीचेही आ. बच्चू कडू व इतरांनी दर्शन घेतले. शिवपुरी येथे रुपलालजी वसिष्ठ दरवर्षी १३ ते १८ एप्रिल रोजी त्या वीर पुरुषाच्या सन्मानात यात्रा भरवितात. त्यांच्याकडून तात्या टोपे यांचे वंशजांचे पत्ते मिळवून मिळ्वून मधुकर टोपे, भालचंद टोपे , वसंत टोपे ,दत्तात्रय टोपे यांची भेट घेण्यात आली. कसाब वर करोडोंचा करणारे सरकार, अब्जोंचे घोटाळे करणारे सरकार शहिदांच्या स्मारकास , त्यांच्या कुटुंबियांस वा यात्रेस एक छदामही खर्च करत नाही. आमचा भारतीयही धर्माच्या नावावर थयथयाट करतो, परंतु आमचा गौरवशाली इतिहास समजून घेत नाही , त्याचे जतन करत नाही . हि आमची 'राष्ट्रीय शरम' आहे व देशाच्या आजच्या दुरवस्थेचे कारण . देशभरात जाज्वल्य देशभक्ती अन राष्ट्राभिमानाची लाटा उभी राहावी यासाठी प्रहारचे हे प्रयत्न सुरूच राहतील. शिवपुरी या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक व्हावे व तेजस्वी इतिहासाची साक्ष सांगणारे संग्रहालय उभे राहावे या स्थानिकांच्या मागणीस प्रहार संघटनेचा पाठींबा आहे.
या क्रांती यात्रेत आ. बच्चू कडू यांचे सोबत, इतिहासकार प्रमोद मांडे , पुणे , अमर शिंगारे पुणे, ऋषी श्रीवास , नगर सेवक प्रहर., धीरज जयस्वाल , गणेश पुरोहित , गाजुभाऊ कुबडे , घनश्याम पालीवाल , मित्रविंद पुरोहित, तुषार देशमुख ई प्रहारचे कार्यकर्ते सहभागी आहेत .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा