शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी आ. बच्चू कडू यांनी १ जून रोजी गडचिरोली येथे रक्तदान करून रालीस सुरुवात केली.महाराष्ट्रातील विविध शहरांना-गावांना भेटी देत ते ४ जून रोजी मुंबईत पोहचले. त्याच दिवशी , ४ जून रोजी त्यांनी आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषणास सुरुवात केली. शरीराची रक्तदान व प्रवासामुळे झालेली झीज भरून निघायच्या आधीच त्यांनी या उपोषणाला सुरुवात केली. देशाला अन्न पुरविण्यासाठी मातीत रक्त आटवूनही ज्याच्या जगण्याची दैना होते, ज्याची झीज होते त्या शेतकऱ्यांच्या व्यथा शासनाच्या दगडी काळजापर्यंत पोचविण्यासाठी त्यांनी या उपोषणाला सुरुवात केली. ग्राहकांच्या आधी शेतकऱ्यांचा विचार व्हायला हवा, देशाच्या धोरणातच ते दिसायला हवे या महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या उपदेशाचा विसर राज्यकर्त्यांना पडला आहे. ती आठवण व शेतकरी हिताचे धोरण या सरकारला राबविण्यासाठी आपण भाग पाडू असा निर्धार प्रहारचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी केला.
नंतर भाववाढीसाठी फसवी आंदोलना करण्यापेक्षा , अमुलाग्र बदल घडवू शकणार्या मागण्या घेऊन प्रहाराने सुरु केलेल्या या आंदोलनास राज्यातील अनेक आमदार, शेतकरी नेते व शेतकऱ्यांचे समर्थन प्राप्त होत आहे. परंतु हि लढाई आता मुंबईबरोबरच गाव-गावात लढली जावी. ठीक-ठिकाणच्या शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी, प्रकल्पग्रस्तांनी या आंदोलनात उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे. आ. बच्चू कडू यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ ७ आणि ८ जूनला तहसील कार्यालयांसमोर शेतकरी-कष्टकर्यांनी- शेतमजुरां नी, प्रकल्पग्रस्तांनी भजन-ठिय्या आंदोलन करण्याचे आवाहन प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर भजन करून, या शासनाला सद्बुद्धी देण्यासाठी देवाला साकडे घाला. तसेच आपल्या भावना निवेदनाद्वारे तहसिलदारामार्फात मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवाव्या अशा सूचना प्रहारतर्फे कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे.
'न्याय मिळायला उशीर होणे हे न्याय न मिळण्यासारखे आहे.' गेल्या ५०-६० वर्ष शेतकरी वाट पाहतोय. आमचा अंत सरकारने पाहू नये. आंदोलनाचा शांततामय मार्ग हि आमची 'एकमेव' पसंती नसून 'पहिली' पसंती आहे, हे शासनाने लक्षात ठेवावे असा इशाराहि प्रहारचे विदर्भ-प्रमुख संजय देशमुख यांनी दिला आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी खालील क्रमांकांवर संपर्क करावा संजय देशमुख,विदर्भ-प्रमुख ९८२२६५७५०६, सुहास गोलांडे, महाराष्ट्र संपर्क प्रमुख ९८५५२५५४५४, पवन वासू, अमरावती ९०१११०८८६८ ,गजूभाऊ कुबडे, वर्धा ९४२००६०६६१, राजेश पाखमोडे, भंडारा ९६३७६३२६३०, बाळा जगताप, वर्धा ९८२३५४०८८८ ,प्रदीप देशमुख, चंद्रपूर ७५७८६८७१७१, धर्मेंद्र तारक, यवतमाळ ९४२०५४९१९२, वैभव मोहिते, बुलढाणा ९८२२५०५०५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा