मंगळवार, ५ जून, २०१२

आ. बच्चू कडू यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ ७ आणि ८ जूनला तहसील कार्यालयांसमोर भजन-ठिय्या आंदोलन: प्रहारच्या पदाधिकाऱ्यांचे आवाहन


शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी आ. बच्चू कडू यांनी १ जून रोजी गडचिरोली येथे रक्तदान करून रालीस सुरुवात केली.महाराष्ट्रातील विविध शहरांना-गावांना भेटी देत   ते ४ जून रोजी मुंबईत पोहचले. त्याच दिवशी , ४ जून रोजी त्यांनी आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषणास सुरुवात केली. शरीराची रक्तदान व प्रवासामुळे झालेली झीज भरून निघायच्या आधीच त्यांनी या उपोषणाला सुरुवात केली. देशाला अन्न पुरविण्यासाठी मातीत रक्त आटवूनही  ज्याच्या जगण्याची दैना होते, ज्याची झीज होते त्या शेतकऱ्यांच्या व्यथा शासनाच्या दगडी काळजापर्यंत पोचविण्यासाठी त्यांनी या उपोषणाला सुरुवात केली. ग्राहकांच्या आधी शेतकऱ्यांचा विचार व्हायला हवा, देशाच्या धोरणातच ते दिसायला हवे या महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या उपदेशाचा विसर राज्यकर्त्यांना पडला आहे. ती आठवण व शेतकरी हिताचे धोरण या सरकारला राबविण्यासाठी आपण भाग पाडू असा निर्धार प्रहारचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी केला.
 नंतर भाववाढीसाठी फसवी आंदोलना करण्यापेक्षा , अमुलाग्र बदल घडवू शकणार्या मागण्या घेऊन प्रहाराने सुरु केलेल्या या आंदोलनास राज्यातील अनेक आमदार, शेतकरी नेते व शेतकऱ्यांचे समर्थन प्राप्त होत आहे. परंतु हि लढाई आता मुंबईबरोबरच गाव-गावात लढली जावी. ठीक-ठिकाणच्या शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी, प्रकल्पग्रस्तांनी या आंदोलनात उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे.  आ. बच्चू कडू यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ ७ आणि ८ जूनला तहसील कार्यालयांसमोर शेतकरी-कष्टकर्यांनी- शेतमजुरांनी, प्रकल्पग्रस्तांनी  भजन-ठिय्या आंदोलन करण्याचे आवाहन  प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर भजन करून, या शासनाला सद्बुद्धी देण्यासाठी देवाला साकडे घाला. तसेच आपल्या भावना निवेदनाद्वारे तहसिलदारामार्फात मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवाव्या अशा सूचना प्रहारतर्फे कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे.    
 'न्याय मिळायला उशीर होणे हे न्याय न मिळण्यासारखे आहे.' गेल्या ५०-६० वर्ष शेतकरी वाट पाहतोय. आमचा अंत सरकारने पाहू नये.  आंदोलनाचा शांततामय मार्ग हि आमची 'एकमेव' पसंती नसून 'पहिली' पसंती आहे, हे शासनाने लक्षात ठेवावे असा इशाराहि प्रहारचे विदर्भ-प्रमुख संजय देशमुख यांनी दिला आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी खालील क्रमांकांवर संपर्क करावा  संजय देशमुख,विदर्भ-प्रमुख ९८२२६५७५०६, सुहास गोलांडे, महाराष्ट्र संपर्क प्रमुख ९८५५२५५४५४, पवन वासू, अमरावती ९०१११०८८६८ ,गजूभाऊ कुबडे, वर्धा ९४२००६०६६१,  राजेश पाखमोडे, भंडारा ९६३७६३२६३०, बाळा जगताप, वर्धा ९८२३५४०८८८ ,प्रदीप देशमुख, चंद्रपूर ७५७८६८७१७१, धर्मेंद्र तारक, यवतमाळ ९४२०५४९१९२, वैभव मोहिते, बुलढाणा ९८२२५०५०५

सोमवार, ४ जून, २०१२

अन्नदाता शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आ. बच्चू कडू यांचे रक्तदान करून अन्नदान आंदोलन सुरु


आज ४ जून रोजी सायंकाळी ४ वाजता आ. बच्चू कडू यांनही शेतकऱ्यांच्या मागणीसाठी तिरंगा पूजनाने आमरण उपोषणास सुरुवात केली. बलराम जखड, माजी केंद्रीय कृषी मंत्री यांनीही बच्चुभाऊ यांना शुभेच्छा पाठविल्या.

 
bसिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीराई धरणग्रस्त यांनीही आंदोलनात सहभाग घेतला.
















आर. पी. आय. चे राजेंद्र गवई यांनीही आपले कार्यकर्ते व पदाधिकारी यांसह उपोशांस्थालास भेट देऊन आपला पाठींबा जाहीर केला. त्यांनी किमान एक दिवस बच्चू भाऊ सह  या उपोषणात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. आर. पी. आय. चे कार्यकर्ते यापुढे गाव-गावठी आंदोलन सुरु करतील असे राजेंद्र गवई म्हणाले.

यावेळी  आ. रवी राणा यांनीही हजेर राहून आंदोलनास पाठींबा दर्शविला.

रविवार, ३ जून, २०१२

धुळे येथील जाहीर सभेत आ. शरद पाटील तसेच शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रप्रमुख रवी देवांग यांचा बच्चू कडू यांच्या शेतकरी आंदोलनास पाठींबा शेतकरी आंदोलनास पाठींबा


गडचिरोली येथे रक्तदान करून मुंबईकडे निघालेल्या शेतकरी रालीचे आज ३ जून रोजी धुळे येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. आ.बच्चू कडू शेतकरी--शेतमजूर -कष्टकरी-प्रकल्पग्रस्त- अनुशेष-गावातील गोरगरीब यांचा लढा पुढे नेताना ४ जून रोजी आझाद मैदान मुबई येथे आमरण  उपोषणास सुरुवात करीत आहेत.  या आंदोलनास धुळे जिल्हा शिवसेना व असंख्य कोरडवाहू शेतकऱ्यांच्या वतीने पाठींबा देण्यासाठी जाहीर सभा घेण्यात आली आ. बच्चू कडू यांनी सुरु केलेली हि लढाई सर्वसामान्य शेतकऱ्यांची लढाई आहे. गोरगरिबांची लढाई आहे. संघटीतपणे धोरणात्मक बदल घडविण्यासाठी आता शेतकऱ्यांनी एकत्रित येणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या या लढाईत आ. शरद पाटील यांनी आ. बच्चू कडू यांच्या खांद्यास खांदा लावून लढण्याचे आश्वासन दिले.

यावेळी  धुळे जिल्ह्यातील अनेक नेत्यांसह आ. शरद पाटील यांनी आ. बच्चू कडू यांना 'रुमने' देऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी सक्रीय सहभागाचे आश्वासन दिले.  


सरकार शेतकऱ्यांची सतत पिळवणूक करीत आहे. खरे म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या या  आत्महत्या नसून सरकारचे शेतकरी विरोधी धोरणाने केलेल्या हत्याच आहेत. आधी डेरा आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही कोरडवाहू शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या मान्य करून घेतल्या. शेतकऱ्यांच्या सुगीच्या दिवसाची हि सुरुवात आहे. परंतु अजूनही अनेक महत्वाच्या व जिव्हाळ्याच्या मागण्या मान्य व्हायच्या आहेत. यासाठी आम्ही मुंबईत जी लढाई सुरु करतोय, त्याची आग शेतकऱ्यांनी गाव-गाव पर्यंत पोचवावी. असे आवाहन बच्चू कडू यांनी केले.



शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रप्रमुख रवी देवांग यांनीही बच्चू कडू यांच्या शेतकरी आंदोलनास पाठींबा दिला. 

या सभेप्रसंगी आ. बच्चू कडू , शरद पाटील यांच्यासह  प्रहारचे विदर्भाप्रमुख संजय देशमुख, अतुलभाऊ सोनावणे, शिवसेना जिल्हाप्रमुख धुळे, शेतकरी नेते रवी देवांग , लीलानंद माली, धुपेंद्र लांगे , प्रहारचे प्रवीण हिंडवे, मंगेश देशमुख, गजू कुबडे, प्रफुल डाफ आदी मान्यवर उपस्थित होते.    

शनिवार, २ जून, २०१२

शेगाव येथील सभा !



मा. आ. बच्चू कडू, शेगाव येथील सभेत, "शेतकऱ्यांनो, या आंदोलनासाठी १५ दिवस काढून ठेवा .... पिकविण्यासाठी वर्षभर मेहेनत घेताच , आता शेतीचा योग्य धोरण आणि हमीभाव यासाठी आपला नांगर शेतात घालायचा आधी सरकारी कार्यालयांत घाला ... जय बळीराजा !!!"












शुक्रवार, १ जून, २०१२

अन्नदाता शेतकऱ्यांसाठी मा. आ. बच्चू कडू व कार्यकर्त्यांनी गडचिरोली येथून रक्तदानाने केली आंदोलनाला सुरुवात

दि. १ जून २०१२: गडचिरोली येथे आ. बच्चू कडू व कार्यकर्त्यांनी
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रक्तदान करून आंदोलनाला सुरुवात केली.
शासन दरबारी शेतकऱ्यांच्या विविध व महत्वपूर्ण मागण्या प्रलंबित आहेत. या
पूर्वी आ. बच्चू कडू यांनी नागपूर येथे पिक्माल निर्यात बंदी तोडो आंदोलन
केले. नंतर मा. मुख्यमंत्र्यांच्या गावी पाच मागण्या घेऊन डेरा आंदोलन
केले. त्या आंदोलनामध्ये मुख्यामान्त्यानी सकारात्मक भूमिका घेत सदर
मागण्यांवर प्रस्ताव तयार करणार अशी घोषणा केली. परंतु कोरडवाहू
शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र धोरण वगळता बाकीच्या मागण्या अजूनही प्रलंबित
आहेत. 
त्याच कारणावरून आ. बच्चू कडू व कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा पवित्र
स्वीकारला आहे. दि. ४ जूनला मुंबई येथे आ. बच्चू कडू सहा शेकडो शेतकरी
बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहेत. तसेच शेतकर्यांना या हक्काच्या लढाईत
सामील  होण्याचे आवाहन केले आहे.

या आंदोलनात संजय देशमुख, विदर्भ प्रमुख, प्रहार, पप्पू देशमुख,
जिल्हाप्रमुख चंद्रपूर , प्रवीण हेन्डवे, जिल्हाप्रमुख अमरावती, शी
विजुदादा कडू, शेतकरी नेते, फिरोज पठाण, रुपेश घागी, इम्मू भाई, डॉ.
मधुकर गुम्बळे सह शेकडो कार्यकर्ते सहभागी होते.







बुधवार, ३० मे, २०१२

चलो शेगाव, २ जून २०१२ !!!


आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर बाकी सर्वांनी निवडणुकीच्या आधी चालवलेला आंदोलनांचा सपाटा आश्चर्यकारक होता . तरीही एक सुखद विचार असा कि उशिरा का होईना या सर्वांना शेतकऱ्यांची आठवण आली. पण पाण्यावरच्या अशा बुडबुड्यांपासून सावध राहणे आवश्यक आहे. तोही बुडबुडा फुटला आणि नेहेमीप्रमाणे शेतकरी पुन्हा बुडताच राहिला. मध्ये चकचकीत आणि मेडिया-टी. आर. पी. अशा गणितातल्या आंदोलनांचा जमाना आला. देशाच्या सर्व प्रश्नांवर गहन विचार करणारा सामान्य माणूस १-२ महिन्यांसाठी IPL मध्ये सर्व चिंता विसरून गेला. या सर्व वेळात आणि त्याही आधी एक संघटन मात्र लढत  राहिला आणि लढत आहे ...शेतकऱ्यांसाठी ... प्रहार !

विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं थैमान असताना नेहमीच प्रश्न पडतो कि कृषिप्रधान भारतात सर्वात नुकसानीचा व्यवसाय शेती हाच का आहे ? कशाचं अपयश आहे कि शेतकरी वारंवार नाडल्या जातोय, आत्महत्या करतोय.

शेतकरी आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणजे डेरा आंदोलन. थेट मुखामंत्र्यांच्याच गावी निघाले होते आमच्या शेतकरी मावळ्यांना घेऊन आमचे बच्चुभाऊ ... घाबरली  न भाऊ सरकारची  पंढरी. म्हणे एवढे शेतकरी एक होऊन मुतले तर खुर्च्याही वाहून जायच्या. मुख्यमंत्र्यांनी  मोर्चा मध्ये थांबवून पुण्यात शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यातील १-२ मागण्या मान्यही झाल्यात. जसे कि भारताच्या व  राज्याच्या  इतिहासात पहिल्यांदाच एक गोष्ट घडली - राज्याच्या अर्थासंकालापात 'कोरडवाहू'  शेतकऱ्यांसाठी वेगळा खाता उघडला. वेगळी तरतूद झाली. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आता वेगळा धोरण असेल - निधी असेल. बच्चूभाऊंच्या  प्रयत्नांना - भूमिपुत्रांच्या लढ्याला आलेलं हे एक खूप मोठा यश. पण हा पूर्ण विजय नव्हे. अजूनही अनेक  मागण्या  आहेत ... आणि आता थेट मुंबईवर चढाई.

१  जूनला  बच्चुभाऊ शेतकरी बांधवांसोबत गडचिरोली येथून, चंद्रपूर -यवतमाळ  मार्गे  मुंबईस  कूच  करतील . मध्ये २ जून  २०१२ रोजी शेगाव  येथे भव्य सभा  होईल आणि ४ जून पासून  मुंबई  येथे भाऊ आमरण  उपोषणाला  सुरुवात करतील . शेतकऱ्यांसाठी अभ्यासपूर्ण आंदोलना आणि मागण्या करणारा देवमाणूस.. मिडिया आणि पैशांच्या ओंगळ  राजकारण न करता , खरा मैदानात लढणारा लढवय्या ... बच्चुभाऊ बोलावतोय . कुण्या पक्षाचे, कुण्या जातीचे असा पण आपला बाप, आजा शेतकरी होता हे विसरू नका- त्याच्यासाठी चला. या मातीच्या उज्ज्वल भविष्यासाठी चला. एक-एकटे नाही तर सोबत या मातीचा खरा पुत्र असेल त्या सर्वांना घेऊन या.

चलो शेगाव, २ जून २०१२ !!!
चलो मुंबई, ४ जून २०१२ !!!