आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर बाकी सर्वांनी निवडणुकीच्या आधी चालवलेला आंदोलनांचा सपाटा आश्चर्यकारक होता . तरीही एक सुखद विचार असा कि उशिरा का होईना या सर्वांना शेतकऱ्यांची आठवण आली. पण पाण्यावरच्या अशा बुडबुड्यांपासून सावध राहणे आवश्यक आहे. तोही बुडबुडा फुटला आणि नेहेमीप्रमाणे शेतकरी पुन्हा बुडताच राहिला. मध्ये चकचकीत आणि मेडिया-टी. आर. पी. अशा गणितातल्या आंदोलनांचा जमाना आला. देशाच्या सर्व प्रश्नांवर गहन विचार करणारा सामान्य माणूस १-२ महिन्यांसाठी IPL मध्ये सर्व चिंता विसरून गेला. या सर्व वेळात आणि त्याही आधी एक संघटन मात्र लढत राहिला आणि लढत आहे ...शेतकऱ्यांसाठी ... प्रहार !
विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं थैमान असताना नेहमीच प्रश्न पडतो कि कृषिप्रधान भारतात सर्वात नुकसानीचा व्यवसाय शेती हाच का आहे ? कशाचं अपयश आहे कि शेतकरी वारंवार नाडल्या जातोय, आत्महत्या करतोय.शेतकरी आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणजे डेरा आंदोलन. थेट मुखामंत्र्यांच्याच गावी निघाले होते आमच्या शेतकरी मावळ्यांना घेऊन आमचे बच्चुभाऊ ... घाबरली न भाऊ सरकारची पंढरी. म्हणे एवढे शेतकरी एक होऊन मुतले तर खुर्च्याही वाहून जायच्या. मुख्यमंत्र्यांनी मोर्चा मध्ये थांबवून पुण्यात शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यातील १-२ मागण्या मान्यही झाल्यात. जसे कि भारताच्या व राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एक गोष्ट घडली - राज्याच्या अर्थासंकालापात 'कोरडवाहू' शेतकऱ्यांसाठी वेगळा खाता उघडला. वेगळी तरतूद झाली. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आता वेगळा धोरण असेल - निधी असेल. बच्चूभाऊंच्या प्रयत्नांना - भूमिपुत्रांच्या लढ्याला आलेलं हे एक खूप मोठा यश. पण हा पूर्ण विजय नव्हे. अजूनही अनेक मागण्या आहेत ... आणि आता थेट मुंबईवर चढाई.
१ जूनला बच्चुभाऊ शेतकरी बांधवांसोबत गडचिरोली येथून, चंद्रपूर -यवतमाळ मार्गे मुंबईस कूच करतील . मध्ये २ जून २०१२ रोजी शेगाव येथे भव्य सभा होईल आणि ४ जून पासून मुंबई येथे भाऊ आमरण उपोषणाला सुरुवात करतील . शेतकऱ्यांसाठी अभ्यासपूर्ण आंदोलना आणि मागण्या करणारा देवमाणूस.. मिडिया आणि पैशांच्या ओंगळ राजकारण न करता , खरा मैदानात लढणारा लढवय्या ... बच्चुभाऊ बोलावतोय . कुण्या पक्षाचे, कुण्या जातीचे असा पण आपला बाप, आजा शेतकरी होता हे विसरू नका- त्याच्यासाठी चला. या मातीच्या उज्ज्वल भविष्यासाठी चला. एक-एकटे नाही तर सोबत या मातीचा खरा पुत्र असेल त्या सर्वांना घेऊन या.
चलो शेगाव, २ जून २०१२ !!!
चलो मुंबई, ४ जून २०१२ !!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा