गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०११

चल उठ तरुणा, देश तुला बोलावतोय… विजय तुला खुणावतोय…


८ डिसेंबर रोजी होणार नगर परिषदेची निवडणूक!
खऱ्या लोकशाहीच्या मार्गाने, दारू – पैसा न वाटता, जात – धर्म न सांगता लढण्यासाठी ‘प्रहार पक्षातर्फे’ अगदी तरुण उमेदवार निवडणुकीत उतरत आहेत, त्या सर्वांच प्रथम अभिनंदन |
अनेक तरुण या चांगल्या कार्यास पाठींबा आहे असा म्हणतात, खरोखरीच मदतही करतात… पण त्यांना प्रश्न, जर दोन चोर रिंगणात असतील तर त्यापैकीच एक निवडून येणार ना ? चांगला देश, चांगलं गाव हवा आहे? मग तुम्हालाही मैदानात उतरावे लागेल…
लोक नोकरी करून, धंदा सांभाळून नगर-सेवक आहेत, तुम्ही अभ्यास, नोकरी सांभाळून नगर-सेवक बनू शकणार नाही? नक्कीच बनू शकता आणि तुम्ही योग्य कार्यही करू शकता — मी रुपेश घागी स्वतः तुमच्या सोबत आहे
२१ वर्षांच्या वर वय आहे न? मग या मैदानात…
(वरोरा व इतरही शहरातील इच्छुक तरुणांनी संपर्क साधा- rupesh.ghagi@maximess.com/ 9730445045)

शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०११

शेतकरी महामोर्चास मार्गदर्शन: चंदुभाऊ वानखेडे

चंदुभाऊ वानखेडे, जेष्ठ पत्रकार 
प्रहारचा शेतकरी महामोर्चा, २३ सप्टेंबर २०११ रोजी दसरा मैदान अमरावती येथे मार्गदर्शन करताना 

बुधवार, २८ सप्टेंबर, २०११

शेतकऱ्यांचे डेरा आंदोलन... मुख्यमंत्र्यांनी मागितली तीन महिन्याची मुदत...

२६ तारखेला पुणे येथे मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलाविलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शेतकरी, मा. आ. बच्चुभाऊ कडू व इतरांशी चर्चा केली. मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व मागण्यांचा राज्य व केंद्र स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत मागितली.

मागण्यांचे स्वरूप बघून शेतकर्यांनी हि मुदत सरकारला दिली व मुख्यमंत्र्यांच्या गावी निघालेले शेतकरी, आंदोलन 'तूर्तास' स्थगित करून परतले.

सरकारा सावध... गाठ बळीराजाशी  आहे...

मुदत पाळा, नाही तर रुंमणं   घेऊन आम्ही आहोच तय्यार !!!

रविवार, २५ सप्टेंबर, २०११

बळीराजा दंड थोपटतो तेव्हा...

वर्षानुवर्षे चालत आलेल्या अन्यायाविरुद्ध शेतकरी पेटला. प्रहार चे संस्थापक-अध्यक्ष आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात, देशभरातील शेतकरी नेत्यांच्या साक्षीनं सुरु झाला महासंग्राम..." भिक नको, ... घेऊ घामाचे दाम! "

थोडक्यात आत्ता पर्यंतचा वृत्त्तांत

२३ सप्टेंबर. दसरा मैदान, अमरावती 
४० हजार शेतकरी एका आवाजात ललकारी देत होते... "आता मरणार नाही, लढणार आम्ही!"
शेतमजुरांची मजुरी व शेतकऱ्यांचे उत्पन्न सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे कमीत-कमी ३०० रु. रोज व्हायलाच पाहिजे. त्याकरिता पेरणी-ते-कापणी पर्यंत सर्व कामे रोजगार हमी योजनेतून घ्या, सर्व जमिनीला सिंचनाची व्यवस्था करा, हमीभाव इ. अनेक मागण्यांतून शेतकऱ्याला सन्मानान जगता यावे, त्याच्या घामाच्या धारांसोबत अन्याय होऊ नये अशा मागण्या करण्यात आल्या. सुमारे आठ हजार शेतकरी आपलं गार्हाण घेऊन मुख्यमंत्र्यांच्या गावाकडे झाले रवाना. पूर्ण अमरावती दुमदुमली... बळीच राज्य येऊ दे !    

२४ सप्टेंबर.
नांदगाव(खं.)- कारंजा- सेलू बाजार- मालेगाव- मेहकर-सिंदखेड राजा
भरगच्च सभा, भारलेलं वातावरण. सगळीकडे बळीराजाचा दबदबा.आ. सुभाष झनक यांचा आंदोलनास पाठींबा.
दिवसभरात अनेक सभा घेण्यात आल्या. सिंदखेड राजा येथे मुक्काम. 

२५ सप्टेंबर.
सिंदखेड राजा -(पूजन व सभा)-जालना- औरंगाबाद- नेवासा- देवगाव(मुक्काम.)  
शेतकर्यांचा वाढता प्रतिसाद. हक्काच्या लढाईसाठी गरजणारा शेतकरी. सरकारचे डावपेच सुरु.
सातारा जिल्ह्यात सरकारने जमावबंदी लागू केली. 
रात्री बच्चूभाऊंना अटक करण्यासाठी पोलीस आले असताना, शेतकरी माय-माउलींनी   पदर खोचला..."न्या आमच्या भाऊंना पकडून--- आम्ही मुक्कामास असलेल्या तिसर्या मजल्यावरूनच खाली उडी टाकू---" बच्चूभाऊंसाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी हा प्रतिसाद पाहून पोलिसाना ग्यावी लागली माघार...
आता बळीचा राज्य येणार.

आजचा कार्यक्रम 
२६ सप्टेंबर.
शिकारपूर- चाकण- देहू(रक्तदान शिबीर)-पुणे- सातारा
आज सभा व रक्तदान शिबीर घेण्याला सरकार विरोध करतंय. प्रहार रक्त देऊन क्रांती करणारच- रक्तदान शिबीर होणारच... महाराष्ट्रात आजपर्यंत सर्वात जास्त रक्तदान करून रुग्णांना वाचवणारी संघटना आज शेतकऱ्याच्या आंदोलनासाठी पुन्हा रक्तदान करणार...

आणि गरज पडलींच तर उद्याही रक्त...

शेतकऱ्यांच्या हक्काच्या लढाईत सामील व्हा--- पुणे परिसरातील मित्रहो--- आज दु. चार वाजता देहू येथे येऊन आंदोलनास आपलाही पाठींबा द्या.





शनिवार, २४ सप्टेंबर, २०११

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गुणकारी 'बाम' - एक बाम, अनेक काम


३०-४० हजार शेतकर्यांनी मा. आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सरकारविरुद्ध व उदासिनतेविरुद्ध रणशिंग फुंकले. राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांच्या या एतिहासिक संमेलनास भारतभरातील अनेक शेतकरी नेते हजार होते. हमीभाव, शेतीसाठी पाणी अशा अनेक मागण्यासोबातच आमदार बच्चू कडू यांनी एक महत्वाची मागणी केली. पेरणीपासून कापणीपर्यंत शेतातील सर्व कामे रोजगार हमी योजनेत आणावीत व सहाव्या वेतन आयोग प्रमाणे शेतमजुरांची मजुरी ३०० रुपये प्रतिदिन एवढी करावी. महाराष्ट्र सरकारचे रोजगार हमी योजनेचे यावर्षीच्या ६०० कोटींपैकी १०० कोटीही खर्च झाले नाहीत. पण आ. बच्चू भाऊंच्या सूचनेप्रमाणे सरकारने जर रोजगार हमी योजनेत हि कामे घेतली तर शेतकऱ्यांना हा खर्च लागणार नाही व शेती व्यवसायाला पुन्हा सोन्याचे दिवस येतील. 

समाजाचं काय ?