बुधवार, २१ सप्टेंबर, २०११

मनमोहना, अजब तुझे सरकार...

शहरात जीवन जगण्यासाठी एका व्यक्तीला दिवसाकाठी ३२ रुपये पुरेसे आहेत तर खेड्यात २६ रुपये पुरेसे आहेत असं प्रतिज्ञापत्र नियोजन आयोगानं, पंतप्रधानांच्या सहीनिशी सर्वोच्च न्यायालयात सादर केलं. त्यापेक्षा जास्त खर्च करू शकणारे बी.पी.एल. (दारिद्र्य रेषे खाली) मध्ये नाहीत. अजूनही मनमोहन आमचा हुशार अर्थतज्ञ आहे असं म्हणून जर कोणी त्याची हुशारी बघून त्यांनी देशाचा चालवलेला खेळखंडोबा सहन करा असं सांगितलं, तर त्याला का तुडवू नये.

सामान्य माणसाची अशी थट्टा करण्याचा अधिकार सरकारला; भारतासारख्या लोकशाही देशातच आहे!

मंगळवार, २० सप्टेंबर, २०११

आता मरणार नाही, लढणार आम्ही.

दोन सख्या भावांत जेव्हा वाटणी होते, तेव्हा इंच भराच्या अन्यायाच्या फक्त शंकेवरून एक भाऊ दुसर्यावर धावून जातो. वावर पडो, पण धुर्यासाठी लढू - अशी  आमची लढाऊ वृत्ती. पण जेव्हा मायबाप सरकार पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या दोन ठिकाणच्या शेतकरी भावांना दोन वेगळ्या मापात तोलते तेव्हा आम्ही या सरकारवर का धावून जात नाही. आमच्या नोकरशहा, कर्मचारी भावाला तुपाशी खाऊ घालताना आम्ही कास्तकार उपाशी आहोत हे या सरकारला दिसत नाही का? खर तर शेतकरी कुठलाही असो, कमी अधिक प्रमाणात नाडल्याच जात आहे. पण ज्याच्यावर सगळ्यात जास्त अन्याय झाला तो आमचा लढाऊ वैदर्भीय शेतकरी आताही जागणार नाही का ?

चला उठा , दाखवून द्या या काळ्या आईला... तिच्या लेकरांत अजूनही रग आहे. 
चला, आपल्या संपर्कातल्या प्रत्येकाला स्वतःहून आवतन द्या. स्वतः घरच्या रायबाच लग्न सोडून कोंढाणायाच्या  लग्नाला या... आपल्या शिवाजीनं (बच्चुभाऊ) हाक  दिलीय, प्रत्येक तानाजीनं या, प्रत्येक बाजिप्रभून या, प्रत्येक मावळ्यान या... 

काळ्या आईच्या लेकरांसाठी, तिच्या प्रत्येकच लेकारान या...

आता मरणार नाही, लढणार आम्ही.


२३ सप्टेबर २०११ रोजी अमरावती येथे आ. बच्चुभाऊ कडू (संस्थापक अध्यक्ष: प्रहार युवाशक्ती संघटना) यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा महामोर्चा. 

चलो दसरा मैदान, अमरावती.

सोमवार, १९ सप्टेंबर, २०११

चलो दसरा मैदान, अमरावती.

खर तर त्या टुकार काँग्रेसवर माझे शब्द खर्च करण्याची माझी इच्छा नाही. पण माझ्या भारतीय बांधवांसाठी लिहित रहावेच लागेल. युवक काँग्रेस च्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत आणि काँग्रेस मधली घराणेशाहीची लोकशाही विरोधी प्रवृत्ती पुन्हा बाहेर येत आहे. यवतमाळ चा जिल्हाप्रमुख कोण तर माणिकरावांचा छोकरा, नागपुरात कोण तर दत्ताभाऊंचा पिटुकला...अन या सर्व वासरांत शहाणी, लंगडी गाय कोण, तर गांधीचा शेम्बडू... ज्याला स्वतःच्या ठोस भूमिकाही नाहीत. जवळपास सगळीकडे हेच. आलटून-पालटून जनतेचा रक्त शोषून घेण्याच्या संधी आप-आपसात वाटून घेणाऱ्या जळवांचा समुह. 

म्हणूनच लोकांनी निवडून दिलेले, लोकांसाठी चालणारे आणि लोकांद्वारेच (?) चालविले जाणारे सरकार केंद्रात आणि राज्यात असताना आपल्या रास्त मागण्यांसाठी - नव्हे तर जगण्याच्या अधिकारासाठी - कृषिप्रधान देशातील कास्तकारांना मरणाचीच वाट पहावी लागते. कुठे भगवा घेऊन खंडणी वसुली करणारे, तर कुठे लाळघोटेपणा करून, घराणेशाही करून लुटणारे. लुटल्या गेलाय तो सामान्य माणूस. अन सर्वात जास्त शेतकरी . आत्महत्या केल्यावरही त्याचा तोंडाला पाने पुसण्या पलीकडे केलंय तरी काय शासनकर्त्यांनी?
जणू आत्महत्या हि जगण्याचा अधिकार मिळविण्याची अट  असावी.आपल्याच देशात हा अन्याय आम्ही कास्तकारांची पोरं आता सहन करणार नाही.

आता मरणार नाही, लढणार आम्ही.


२३ सप्टेबर २०११ रोजी अमरावती येथे आ. बच्चुभाऊ कडू (संस्थापक अध्यक्ष: प्रहार युवाशक्ती संघटना) यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा महामोर्चा. 

चलो दसरा मैदान, अमरावती.




गुरुवार, १५ सप्टेंबर, २०११

मा. आ. श्री. बच्चुभाऊ कडू - समाजसेवकांना व प्रहारींना प्रेरणा देताना


"सार्वजनिक पाऊलवाट जेव्हा आपण तयार करतो, व्यक्तिगत पाऊलवाट आपोआपच तयार होत असते." - मा. आ. श्री. बच्चुभाऊ कडू


मा. आ. श्री. बच्चुभाऊ कडू - समाजसेवकांना व प्रहारींना प्रेरणा देताना

सोमवार, १२ सप्टेंबर, २०११

शेतकरी गर्जना - "आता मरणार नाही... लढणार आम्ही !!!"

जाती-धर्म-भाषा हे भेद विसरून सर्व शेतकर्यांनी, काळ्या आईच्या सर्व लेकरांनी एकत्र या-
शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांसाठी डेरा आंदोलन 
चला मुख्यमंत्र्यांच्या गावी- चलो  कराड ! चलो  कराड !! चलो  कराड !!!

चला शेतकर्यानो... उठा शेतमजुरांनो... उठा तरुणांनो... क्रांतीचे पाऊल टाकूया-

शेतकरी बंधुनो,
२३ सप्टेबर २०११ रोजी अमरावती येथे आ. बच्चुभाऊ कडू (संस्थापक अध्यक्ष: प्रहार युवाशक्ती संघटना) यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा महामोर्चा होत आहे.

१० जाने. रोजी नागपूरला प्रहारच्या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले व कापसाचे भाव वाढले.पण सरकार कोणत्या न कोणत्या प्रकारे शेतकर्याना नाडते. त्यामुळे आता सरकारचा पक्का बंदोबस्त करून खालील मागण्यांसाठी २३ सप्टेंबर ला अमरावती येथे महामोर्चा व तेथून असंख्य शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या गावी रवाना होतील व तेथे मागण्या मान्य होईपर्यंत घेराव घालतील. 


या आंदोलना विषयी शेतकरी भवन, माढेळी त. वरोरा, जिल्हा-चंद्रपूर येथे पूर्वतयारी मार्गदर्शन सभा-बैठक
दि. १७ सप्टेंबर रोजी दु. १२ वा.
प्रमुख उपस्थिती- १) श्री पप्पुभाऊ देशमुख, जिल्हाध्यक्ष- प्रहार संघटना
                           २) श्री रुपेशकुमार घागी, विदर्भ प्रमुख, प्रहार विद्यार्थी संघटना

अधिक माहितीसाठी संपर्क- ९२७०२७१५५८, ९७६५४४७४१३ 

रविवार, ११ सप्टेंबर, २०११

मा. आमदार बच्चुभाऊ कडू वरोरा येथे मार्गदर्शन करताना

मा. आमदार बच्चुभाऊ कडू वरोरा येथे मार्गदर्शन करताना. सामाजिक कार्यकर्त्यांनी कसे काम करायला पाहिजे याविषयी ते बोलताहेत... जरूर ऐकाव असं काही.