सोमवार, १९ सप्टेंबर, २०११

चलो दसरा मैदान, अमरावती.

खर तर त्या टुकार काँग्रेसवर माझे शब्द खर्च करण्याची माझी इच्छा नाही. पण माझ्या भारतीय बांधवांसाठी लिहित रहावेच लागेल. युवक काँग्रेस च्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत आणि काँग्रेस मधली घराणेशाहीची लोकशाही विरोधी प्रवृत्ती पुन्हा बाहेर येत आहे. यवतमाळ चा जिल्हाप्रमुख कोण तर माणिकरावांचा छोकरा, नागपुरात कोण तर दत्ताभाऊंचा पिटुकला...अन या सर्व वासरांत शहाणी, लंगडी गाय कोण, तर गांधीचा शेम्बडू... ज्याला स्वतःच्या ठोस भूमिकाही नाहीत. जवळपास सगळीकडे हेच. आलटून-पालटून जनतेचा रक्त शोषून घेण्याच्या संधी आप-आपसात वाटून घेणाऱ्या जळवांचा समुह. 

म्हणूनच लोकांनी निवडून दिलेले, लोकांसाठी चालणारे आणि लोकांद्वारेच (?) चालविले जाणारे सरकार केंद्रात आणि राज्यात असताना आपल्या रास्त मागण्यांसाठी - नव्हे तर जगण्याच्या अधिकारासाठी - कृषिप्रधान देशातील कास्तकारांना मरणाचीच वाट पहावी लागते. कुठे भगवा घेऊन खंडणी वसुली करणारे, तर कुठे लाळघोटेपणा करून, घराणेशाही करून लुटणारे. लुटल्या गेलाय तो सामान्य माणूस. अन सर्वात जास्त शेतकरी . आत्महत्या केल्यावरही त्याचा तोंडाला पाने पुसण्या पलीकडे केलंय तरी काय शासनकर्त्यांनी?
जणू आत्महत्या हि जगण्याचा अधिकार मिळविण्याची अट  असावी.आपल्याच देशात हा अन्याय आम्ही कास्तकारांची पोरं आता सहन करणार नाही.

आता मरणार नाही, लढणार आम्ही.


२३ सप्टेबर २०११ रोजी अमरावती येथे आ. बच्चुभाऊ कडू (संस्थापक अध्यक्ष: प्रहार युवाशक्ती संघटना) यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा महामोर्चा. 

चलो दसरा मैदान, अमरावती.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा