शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१३

प्रहारच्या २ ऑक्टोबर २०१३ रोजी झालेल्या आंदोलनाचे सुयश

३ ऑक्टोबर ला मंत्रालयात मा. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीचा वृत्तांत. कृपया फाईल वाचावी






गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१३

आमच्या अपंग-अनाथांची,शेतकरी-कष्टकर्यांची दुःख घेऊन जा गे मारबत...

दरवर्षीप्रमाणे उद्या अगदी पहाटेला आमचे गावा-गावातील बांधव गावातली सारी मरगळ, दुःख, संकटं आम्ही प्रतिकात्मक रुपाने गावातुन हद्दपार करु. मारबत हाकलुन वाईट प्रवृत्ती व शक्तिंपासुन स्वतःचे रक्षण करणार. परंतु माझ्या शेतकरी बांधवांनो, माझ्या अपंग बांधवांनो... बहुसंख्येने आणि एकदिलाने लढलं तरच टळल ईडा-पिडा आणि येईल बळीचं राज्य.

आपल्या भोवतालच्या १०-२० प्रश्नांपैकी २-३ सोपे प्रश्न सोडवायचे आणि आपल्या कामाचा डंका ठोकायचा, असे अनेक नेते आणि संघटना आपल्या भोवताल असतात. त्यांचा प्रसारमाध्यमे खुप गाजावाजाही करतात. एखाद्या कंपनिच्या इतक्या गुंतवनुकित इतका नफा अशाप्रमाणेच एक साचेबद्ध समाजसेवा. पण अशाही पैरिस्थितीत एक संघटना अशी असते जी परिणाम कधी येतील याचा विचार न करता सामान्यांच्या जगण्याच्या हक्कांसाठी लढत असते- प्रहार तिचे नाव.

अगदी संयमाने इंच-इंच लढवत गेल्या दोन वर्षांपासुन प्रहारचे शेतकरी आंदोलन व सुमारे एक वर्षांपासुन प्रहार अपंग क्रांती आंदोलन पुढे सरकत आहे. आता २ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे प्रहार होईल... खर्या वंचितांची शोषितांची लढाई.तुम्ही येणार कि नाही... मारबत हाकलायला?

आझाद मैदान, मुंबई

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१३

दिन-दुबळ्यांची सेवा हीच ईश्वरसेवा : बच्चु कडु

देव असलाच तर तो माणसात आहे. दिन-दुबळ्यांची सेवा हीच ईश्वरसेवा असं तुकोबांपासुन तर गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, स्वामी विवेकानंद सांगुन गेले. परंतु अशा गोष्टी फक्त् पुस्तकांतुन वाचुन  आणि लिहुन खुश असणारे काही लोक असतात. स्वतःच्या रोजच्या जीवनातुन-जीवनशैलीतुन असे आदर्श घालुन देणारे लोकही असतात- ते स्वतःच अशा तत्वज्ञानाचं चालतं-बोलतं पुस्तक असतात. बच्चु उर्फ ओमप्रकाश कडू हे असंच एक व्यक्तिमत्व. एखादा माणुस एकाच आयुष्यात इतकं काम करतो कि त्याचं कर्तुत्व शब्दांत मांडणं कुणाच्याच आवाक्यात रहात नाही. या ठिकाणी मी आ. बच्चु कडु यांचे काही विचार आणि आयुष्यातील प्रसंग सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.

आमदार असताना कुठल्यातरी नुकत्याच उगवलेल्या बाबाच्या जन्मोत्सवात बच्चु कडु यांना जनतेनी बोलाविले. हजारो लोक तिथे असणार, आणि तिथे गेल्यास तुमच्या समर्थकांची संख्या वाढणार परंतु स्वार्थाचा विचार न करता अंधश्रद्धा नाकारणारा आणखी एखादा आमदार आहे का हो महाराष्ट्रात ? स्टेजवर नकला करुन आणि मिडीया विकत घेउन आम्ही अंधश्रद्धाविरोधी आहोत हे सांगणारे लोकांना आवडतात, पण अंधश्रद्धेच्या विरोधात खर्या अर्थानं लढणारा आमदार म्हणजे बच्चु कडू. पण ही काही एकच घटना नव्हे. ते आमदार व्हायच्या आधी निवडणुक प्रचारादरम्यान एका गावातील नागरीकांनी त्यांना गावातील मतिमंदाकडे नेले. गावातील लोक त्याला दैवी शक्ती असलेला अवलिया बाबा समजत होते. त्याच्या शिव्यांना प्रसाद मानत होते. परंतु मतांसाठी लोकांच्या अंधश्रद्धांना शरण जावुन सुधारणांना अडसर ठरणे आ. कडु यांना मान्य नव्हते. त्यांच्या बाजुचे गाव त्यांच्या विरोधात गेले, अगदी थोड्या फरकाने त्यांना निवडणुक हरावी लागली. पण जिंकणं आणि योग्य यापैकी एकच मिळाणार असेल तर योग्य स्विकारायला मर्दाचं काळीज लागतं.

आ. कडु लहान असतांना त्यांच्या आईने देविला नवस करण्यासाठी दिलेल्या पैशांतुन त्यांनी एका भिकारी म्हातारीची सेवा केली. म्हणुन ते म्हणतात कि एवढीच श्रद्धा असते तर लोक तिरुपतीला हात का कापुन वाहात नाहित? केस पुन्हा येतील म्हणुन माहिती असतं, म्हणुनच गलिच्छ केसांचे  ढिगच्या ढिग जमतात तिथे. कमी पैसे असले तर शिर्डी, जास्त असले की तिरुपती. सगळळ सोईप्रमाणे. उपवास करुन कुण्या उपाशी माणसाला खाऊ घालणार असाल तर ठिक, पण उपवासाच्या नावावर दुप्पट खातात लोक. न स्वतःला आरोग्याचा फायदा, न भुकेल्याला अन्नाचा. देशासाठी बलिदान दिलेल्या भगतसिंगाच्या गावी कुणी जाणार नाही, सोळाव्या वर्षी देशासाठी ब्रिटीशांच्या गोळीने शहीद झालेल्या चिमुरच्या बालाजी रायपुरकर यांचे नावही तिथल्या पालकमंत्र्याला माहिती नसते, पण कुण्या भोंदुबाबाच्या काल्यासाठी आजही लाखो रुपये आणि हजारो लोक जमतात. पण आ. बच्चुभाऊ कडु यांचं आजही आवाहन आहे, या, तिरंगा घ्या हाती. अंधश्रद्धा सोडा आणि देशकार्याला आणि दीन-दुबळ्यांच्या सेवेला वाहुन घ्या.

मंगळवार, २० नोव्हेंबर, २०१२

आ बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहारची चिमूर -ते -हुसेनिवाला क्रांती यात्रा


* तात्या टोपे यांच्या स्मारकास व वंशाजांस भेट ,योगेश टोपे या कॅन्सर ग्रस्त वंशाजास  प्रहार तर्फे १०,०००/- रुपयांची  मदत 
* देवापेक्षाही  देशासाठी लढणारा यांची स्मारके तीर्थक्षेत्रे व्हावीत 
* तात्या टोपे यांचे स्मारक राष्ट्रीय स्मारक घोषित व्हावे व तिथे संग्रहालय व्हावे 
* यात्रा भगत सिंगांच्या गावी रवाना 

आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहारची क्रांती यात्रा १७ नोव्हेंबर रोजी चिमूर ( जिल्हा-चंद्रपूर )  येथील शहीद स्मारकास भेट देऊन हुसैनिवाला (पंजाब ) येथे रवाना झाली. हुसैनिवाला या ठिकाणी भगतसिंग. सुखदेव व राजगुरु यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. चिमूर येथे प्रहारचे संजय देशमुख (विदर्भ प्रमुख ) , रुपेश घागी (विद्यार्थी संघटना- विदर्भ प्रमुख ), इतर कार्यकर्ते तसेच युवा शक्ती संघटनेचे कार्य कर्ते हजर होते. ब्रिटिशांशी लढताना  शहीद झालेल्या अनेक हुतात्म्यांचे  स्मारक दूर्लक्षित  अवस्थेत आहे . चिमूर येथील स्मारकाचे सौन्दर्यी करनाचे काम प्रहार संघटना लवकरच सुरु करणार आहे.

त्यानंतर क्रांती यात्रा शिवपुरी (मध्य प्रदेश) येथे आली . १८५७ च्या महासमरात सहा राज्यांमध्ये इंग्रजांना सळो  कि पळो  करून सोडणारे महापराक्रमी तात्या टोपे यांना इथे फाशी देण्यात आली होती . यांचे स्मारक आणि वंशजही दुर्लक्षित आहे. आर्थिक अडचणीत असलेले टोपे कुटुंबीय यांचीही भेट आ.  कडू यांनी घेतली घेतली. कुटुंबातील योगेश टोपे या कॅन्सर ग्रस्त वंशाजास  प्रहार तर्फे १०,०००/- रुपयांची  करण्यात आली . येथील  तुरुंगाधीकार्यांची भेट घेऊन तात्या टोपे  यांना  ठेवण्यात आलेली कारागृहाची खोलीचेही आ. बच्चू कडू व इतरांनी दर्शन घेतले. शिवपुरी येथे रुपलालजी वसिष्ठ दरवर्षी १३ ते १८ एप्रिल रोजी त्या वीर पुरुषाच्या सन्मानात यात्रा भरवितात. त्यांच्याकडून तात्या टोपे यांचे वंशजांचे पत्ते मिळवून मिळ्वून  मधुकर  टोपे, भालचंद टोपे , वसंत टोपे ,दत्तात्रय टोपे यांची भेट घेण्यात आली.  कसाब वर करोडोंचा करणारे सरकार, अब्जोंचे घोटाळे  करणारे सरकार शहिदांच्या स्मारकास , त्यांच्या कुटुंबियांस वा यात्रेस एक छदामही  खर्च करत नाही. आमचा भारतीयही धर्माच्या नावावर थयथयाट  करतो, परंतु आमचा गौरवशाली इतिहास समजून घेत नाही ,  त्याचे जतन करत  नाही . हि आमची 'राष्ट्रीय शरम' आहे व देशाच्या आजच्या दुरवस्थेचे कारण .  देशभरात जाज्वल्य देशभक्ती अन राष्ट्राभिमानाची लाटा उभी राहावी यासाठी प्रहारचे  हे प्रयत्न सुरूच राहतील. शिवपुरी या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक व्हावे व तेजस्वी इतिहासाची साक्ष सांगणारे संग्रहालय उभे राहावे या स्थानिकांच्या मागणीस प्रहार  संघटनेचा पाठींबा आहे.

या क्रांती यात्रेत आ. बच्चू कडू यांचे सोबत, इतिहासकार प्रमोद  मांडे , पुणे ,   अमर शिंगारे  पुणे, ऋषी श्रीवास , नगर सेवक प्रहर., धीरज जयस्वाल , गणेश पुरोहित , गाजुभाऊ कुबडे , घनश्याम  पालीवाल , मित्रविंद   पुरोहित, तुषार  देशमुख  ई  प्रहारचे कार्यकर्ते सहभागी आहेत .       

शुक्रवार, २९ जून, २०१२

१ जुलै रोजी अमरावती येथे प्रहारचा कार्यकर्ता मेळावा


 प्रहारचा कार्यकर्ता मेळावा रविवार दिनांक १ जुलै २०१२ रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, अमरावती येथे आयोजित केलेला आहे. प्रसिद्ध वक्ते शिवरत्न शेटे यांचे 'शिवराय आज असते तर...' या विषयावर व्याख्यान सकाळी ११.३० ला आयोजित केले आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी सतत शिवरायांचे नाव वापरणारी अनेक मंडळी या महाराष्ट्रात आहेत. परंतु जनतेच्या हिताची नीती राबवणारे उत्तम प्रशासक, रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवराय सामन्यापर्यंत कधीच प्रभावीपणे पोहचविण्यात आलेले नाहीत. म्हणूनच शिवरायांचे शेतकरी, मुसलमान, भ्रष्टाचार याविषयीचे खरे विचार कधीच जन-सामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन 'स्वराज्याची' घडी नीट बसविण्याएवजी, सारा देश सामन्यांचे प्रश्न सोडून, टी.आर.पी. वाढविणाऱ्या आणि प्रसिद्धी देणाऱ्या प्रश्नांचे राजकारण  करत राहतो. खरे शिवराज कार्यकर्त्यांसमोर उभे करण्याचा प्रयत्न या व्याख्यानाच्या माध्यमातून होणार आहे. यावेळी प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे व आ. बच्चू कडू हे प्रामुख्याने उपस्थित असतील व मेळाव्यास मार्गदर्शन करतील.

जून महिन्यात गडचिरोलीत रक्तदान, राज्यात ठिकठिकाणी मेळावे व आझाद मैदान येथे उपोषण करून आ.बच्चू कडू व प्रहारच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचे काही प्रश्न मार्गी लावले. या आंदोलनानंतर प्रहारचा हा पहिलाच मेळावा. विदर्भातील विविध जिल्ह्यातून प्रहारचे शेकडो कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित असतील.  

रविवार, १० जून, २०१२

उपोषण मागे



शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी आ. बच्चू कडू यांनी १ जून रोजी गडचिरोली येथे रक्तदान करून रालीस सुरुवात केली.महाराष्ट्रातील विविध शहरांना-गावांना भेटी देत   ते ४ जून रोजी मुंबईत पोहचले. त्याच दिवशी , ४ जून रोजी त्यांनी आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषणास सुरुवात केली. शरीराची रक्तदान व प्रवासामुळे झालेली झीज भरून निघायच्या आधीच त्यांनी या उपोषणाला सुरुवात केली. देशाला अन्न पुरविण्यासाठी मातीत रक्त आटवूनही  ज्याच्या जगण्याची दैना होते, ज्याची झीज होते त्या शेतकऱ्यांच्या व्यथा शासनाच्या दगडी काळजापर्यंत पोचविण्यासाठी त्यांनी या उपोषणाला सुरुवात केली. दि. 7 जून रोजी    त्यांच्या उपोषणाचा ४थ  दिवस होता.  त्यांची तब्येत खालावली होती. वजन ३ किलोंनी कमी होऊन  रक्तातील ग्लुकोज चे प्रमाण कमी झाले. अशातच आ. बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ  शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजयभाऊ जावंधिया यांनीही वर्धा येथे आमरण उपोषणास सुरुवात केली.     






याच  दिवशी राज्यभरात ठिकठिकाणी भजन व ठिय्या आंदोलन करण्यात आले. कार्यकर्ते व शेतकरी तहसील कार्यालयांबाहेर भजन करून शासनाला सद्बुद्धी मिळू दे अशी प्रार्थना केली व तहसिल्दारांमार्फात मुख्यमंत्री महोदयांना निवेदन पाठविले.चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, धुळे, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, जालना, बुलढाणा आदी जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांत हे आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या वाढत्या दबावामुळे मुख्यमंत्री महोदयांनी 7 जुन रोजी दुपारी ४ वाजता आंदोलकांसोबत बैठक आयोजित केली. कोरडवाहू मिशन स्थापन करणार असल्याची ग्वाही दिली. तसेच इतर मागण्यांसंदर्भात समिती स्थापन करून त्यात शेतकऱ्यांचे प्रतिनिधी ठेवण्याचे आदेश दिले. पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या बलीराज्यासाठी महत्वाचे दान पदरात पडून घेत बच्चुभाऊ यांनी उपोषण मागे घेतले.